Jeep Meridian : भारतात लवकरच लाँच होणार ही नवी दमदार एसयूव्ही कार | पुढारी

Jeep Meridian : भारतात लवकरच लाँच होणार ही नवी दमदार एसयूव्ही कार

पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रसिद्ध स्पोर्ट्स युटिलिटी व्हेईकल (SUV) उत्पादक जीप कंपनीने (Jeep) मंगळवारी तिची नवीन 7-सीटर SUV मेरिडियन (Meridian) भारतीय बाजारपेठेत लाँच करत असल्याचे जाहीर केले.

Jeep Meridian Launch Date, Expected Price Rs. 26.00 Lakh, Images & More Updates - CarWale

जीप मेरिडियन SUV ही जागतिक बाजारपेठेत कमांडर या नावाने विकली जाईल. ती आता भारतात येणार ही एसयुव्ही कार चाहत्यांकरिता खुशखबर आहे. कंपास ट्रेलहॉक नंतर कंपनी आता दुसरी मोठी SUV कार लाँच करत आहे. जीपची मेरिडियन ही कार भारतातील रांजणगाव मॅन्युफॅक्चरिंग प्लांटमध्ये तयार केली जाईल. जीपच्या या भारतात उत्पादित केल्या जाणाऱ्या एसयूव्ही कारची जपान आणि ऑस्ट्रेलियासह आशिया पॅसिफिक प्रदेशात निर्यात केली जाणार आहे.

बुकिंग कधी सुरू होईल

जीपने 2022 मधील नवीन जीप मेरिडियन ही कार कधी लॉंच केली जाईल हे अद्याप कंपनीकडून सांगितले गेले नाही. मात्र, ही एसयूव्ही या वर्षाच्या उत्तरार्धात लॉंच होण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्टनूसार कंपनी मे पासून नवीन जीप मेरिडियनचे बुकिंग सुरू करू करेल.

Jeep Meridian Seven-Seater SUV Unveiled In India Ahead Of Launch

भारतीय बाजारपेठेत लॉंच केल्यानंतर, 2022 मधील हे नवे मॅाडेल मेरिडियन टोयोटा फॉर्च्युनर (Toyota Fortuner) आणि एमजी ग्लोस्टर (MG Gloster ) सारख्या कारशी स्पर्धा करेल.

मेरिडियन कारची खासियत

2022 लाँच होणाऱ्या या नवीन Jeep Meridian SUV मध्ये 2.0-लिटर टर्बो डिझेल इंजिन मिळेल. हे इंजिन 9-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन किंवा 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडलेले असेल.

या एसयूव्हीला फ्रंट-व्हील ड्राइव्ह आणि ऑल-व्हील ड्राइव्ह दोन्ही प्रणाली मिळेल. तसेच, मेरिडियनला स्नो, सँड/मड आणि ऑटो असे तीन ड्राइव्ह मोड मिळतील. ही SUV फक्त 10.8 सेकंदात 0 ते 100 किमी प्रतितास वेग घेऊ शकते आणि तिचा टॉप वेग 198 किमी प्रतितास आहे.

मेरिडियनला बाय-फंक्शन एलईडी हेडलॅम्प, इंटिग्रेटेड एलईडी डेटाइम रनिंग लाइट्ससह आकर्षक बंपर, एलईडी फॉग लॅम्पसह आयकॉनिक 7-स्लॅट ग्रिल आहेत. या SUV कारला बॉडी क्लॅडिंग, पॅनोरामिक सनरूफच्या दोन्ही बाजूला इंटिग्रेटेड रूफ रेल आहेत. याला जीप कंपासच्या तुलनेत मागील बाजूस मोठे ओव्हरहँड आणि मोठे दरवाजे असतील. त्याचबरोबर याला LED टेललाइट्स, मागील वायपर आणि वॉशर, तसेच इंटिग्रेटेड रियर स्पॉयलर मिळतात. या SUV ला 18-इंच डायमंड-कट अलॉय व्हील्स मिळतात.

हेही वाचा

Back to top button