पुण्यात रात्री ११ ते सकाळी ५ पर्यंत शहरात संचारबंदी; तर दिवसा जमाव बंदी | पुढारी

पुण्यात रात्री ११ ते सकाळी ५ पर्यंत शहरात संचारबंदी; तर दिवसा जमाव बंदी

पुणे, पुढारी वृत्तसेवा : शहरातील कोरोनाच्या वाढत्या रूग्णाची संख्या पाहता सोमवारी रात्री अकरा वाजल्यापासून सकाळी पाच वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तर दिवसा सकाळी पाच ते रात्री अकरा वाजेपर्यंत जमाबंदी लागू करण्यात आली आहे. तसे आदेश सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे यांनी काढले आहेत.

कोरोना विषाणुचा प्रसार रोखण्यासाठी उपयोजनांचा भाग म्हणून त्याला प्रसारापासून प्रतिबंध करण्यासाठी ‘ब्रेक द चेन’ आदेश लागू करण्यात आला आहे. दि. 10 जानेवारीपासून दररोज रात्री 11 वाजल्यापासून ते दुसर्‍या दिवशी सकाळी 5 वाजेपर्यंत रात्रीची संचारबंदी करण्यात आली आहे.

दररोज सकाळी 5 ते रात्री अकरापर्यंत जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला असून 5 पेक्षा अधिक जणांना एकत्रीत येण्यास मनाई करण्यात आली आहे. आदेशाचा भंग करणार्‍या व्यक्तीवर कादेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचेही आदेशात सूचित करण्यात आले आहे. या दरम्यान नागरिकांनी मास्कचा वापर करण्याचेही अवाहन पुणे पोलिसांकडून करण्यात आले आहे.

हे वाचलंत का?

Back to top button