iPhone : गोष्ट पहिल्या- वहिल्या अ‍ॅपल आयफोनची | पुढारी

iPhone : गोष्ट पहिल्या- वहिल्या अ‍ॅपल आयफोनची

पुढारी ऑनलाईन डेस्क :
आज मोबाईल फाेन आज आपल्‍या जगण्‍यातील महत्‍वपूर्ण घटक झाला आहे. अवघ जग समीप आणणारा हा मोबाईल फाेन हा जगण्‍यातील सवयीचा भागच झाला आहे. १४ वर्षांपूर्वी आजच्‍या दिवशी म्‍हणजे ९ जानेवारीला लाँच झालेल्‍याआयफोनने मोबाईल फाेनकडे पाहण्‍याचा जगाच्‍या दृष्‍टीकाेनच बदलला;  पण तुम्हाला हे माहित आहे का? जगातील पहिला आयफोनची (iPhone) वैशिष्ट्ये काय होती. चला तर मग जाणून घेवूया पहिल्या आयफोन बाबतीत.

iPhone स्टीव्ह जॉब (Steve Jobs)

iPhone जगातील सर्वात महागडा आणि बहूचर्चित मोबाईलमध्ये आयफोनची iPhone गणना केली जाते.  ९ जानेवारी २००७ राेजी पहिला आयफोन जगासमोर आला. अ‍ॅपलचे (Apple) तत्कालीन सीईओ (CEO) स्टीव्ह जॉब (Steve Jobs) यांनी तीन डिव्‍हाईस कॉम्बिनेशन असलेला आयफोनची घोषणा केली होती. आयपॉड, कॅमेरा, वेब ब्राउझिंग अशी अनेक वैशिट्ये असलेला आयफोन सनफ्रान्सिस्को (कॅलिफोर्निया) येथे मॅकवर्ल्ड संमेलनात त्‍यांनी जगासमाेर आणला. 
iPhone www. pudhari.news
असा होता पहिला आयफोन iPhone

 असा होता पहिला आयफोन iPhone

 
या फोनला ३.५ स्क्रीन, ३२० x ४८०p रिजोलेशन, २ मेगापिक्सल (MP) कॅमेरा असलेल्या आयफोनचा ३.५ इंचाचा मल्टीटच स्क्रीन होता. त्याकाळातील या आयफोनचा सर्वात चांगला डिस्पले स्क्रीन होता. मेमरी ८ जीबी (GB) होती. या मोबाईलमध्ये तुम्ही अ‍ॅप थर्ड पार्टीकडून घेवू शकत नव्हता तर यासाठी कंपनीने आपली स्वत: ची वेगळी ऑपरेटिंग सिस्टीम तयार केली होती. १५३ ग्रॅम वजन असलेल्या या आयफोनची जाडी ११.६ मिलीमीटर होती. त्या काळातील मोबाईलशी तुलना केली तर फोनची जाडी खूप कमी होती. आणि हो पहिल्या आयफोनची किंमत ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल तर या आयफोनची किंमत ४९९ ते ५९९ अमेरिकन डॉलर होती.
याचबरोबर या आयफोनमध्ये iTunes म्युझिक प्लेयर, व्हॉईसमेल आपल्या हवे ते सिलेक्ट करून वाचता येत होते, वायफाय आणि ब्लूटूथ 2.0 अशी बरीच वैशिष्ट्ये असलेला या आयफोनच्या येण्याने मोबाईलबाबत असलेला नजरियाच बदलला. आजही आयफोनला सर्वीधिक मागणी पाहायला मिळेल.  आयफोनला मोबाईलचा बादशहा म्हणून ओळखले जावू लागले आहे.
iPhone www.pudhari.news
हेही वाचलंत का ? 

Back to top button