पुढारी ऑनलाईन डेस्क
ॲपलचा आयफोन १३ सध्या बाजारात आलेला आहे, तआयफोन १४ची लोक वाट पाहात आहेत. तोपर्यंत आयफोन १५ संदर्भात एक बातमी आलेली आहे. आयफोन १५ ला सीम कार्डसाठीचा स्लॉटच असणार नाही. आयफोन १५ हा ई सीम तंत्रज्ञानावर चालेले आणि त्यात दोन नंबर वापरता येण्याचीही सुविधा असेल. (iphone 15)
ब्राझीलमधील एका वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, २०२३ मध्ये लाँच होणाऱ्या म्हणजेच आयफोन १५ प्रोच्या सिरिज या ई सीम तंत्रज्ञानावर आधारलेल्या असतील. (iphone 15) Dual E Sim तंत्रज्ञानावर आधारलेले हे मॉडेल ग्राहकांचे आकर्षण ठरणार आहेत. ही सुविधा असल्याने ग्राहकांना सीम कार्ड नसतानाही दोन नंबर वापरता येणार आहेत; पण ही सुविधा फक्त प्रो मॉडेलसाठी असेल की इतरही मॉडेलवर असणार ही माहिती उपलब्ध नाही. ॲपलला भविष्यात कोणतेही पोर्ट नसलेला फोन बनवयाचा आहे, या दिशेने हे एक पाऊल ठरणार आहे.
ज्या देशात ई सीमची सुविधा उपलब्ध नाही, तेथे मात्र सीम स्लॉट असलेला आयफोन देण्याचा विचार कंपनी करू शकते.
अर्थात या सगळ्यासाठी २०२३ उजाडण्याची वाट पाहावी लागणार आहे.
हेही वाचलं का?