असा जुगाड होणे नाही ! प्लास्टीकच्या बॅरेलचा वापर करून वॉशिंग मशिनची निर्मिती (video) | पुढारी

असा जुगाड होणे नाही ! प्लास्टीकच्या बॅरेलचा वापर करून वॉशिंग मशिनची निर्मिती (video)

पुढारी ऑनलाईन डेस्क

आपल्याला दररोज सोशल मीडियावर नवनवीन जुगाड पाहायला मिळत असतात. जुगाड हा असा मार्ग आहे की आपण कोणतेही काम सोपे सहजरित्या करू शकतो. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये आपल्याला एक नवीन जुगाड पहायला मिळत आहे.

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये आपल्याला जुगाडचा एक नवीन व्हिडिओ पहायला मिळत आहे. असा जुगा़ड तुम्ही याआधी क्वचितच बघितला असेल. या व्हिडिओमध्ये एका अवलियाने चक्क प्लास्टिक ड्रमपासून वॉशिंग मशीन बनवले आहे. ते वॉशिंग मशिन कसे तयार करायचे ते अवलियाने या व्हिडिओमध्ये दाखवले आहे. हा वॉशिंग मशिनचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे, आणि लोकांनाही हा मशिनचा जुगाड खूप आवडला आहे.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीने कपडे धुण्यासाठी जुगाड म्हणून प्लास्टिकचे ड्रमचे वॉशिंग मशिन तयार केल्याचे दिसते. तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता की, ज्या निळ्या रंगाच्या ड्रमचा वापर आपण पाणी साठवण्यासाठी करतो. त्याचा वापर करून या व्यक्तीने प्लास्टिक ड्रमपासून जुगाड करून वॉशिंग मशीन बनवले. ड्रममध्ये पाईप आणि इलेक्ट्रिक मोटरचा वापर करून या व्यक्तीने हे स्वदेशी वॉशिंग मशीन तयार केले आहे.

हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर the.funny.us नावाच्या पेजवरून शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत 54 हजारांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. व्हिडिओवर लोक अनेक कमेंट करून त्या व्यक्तीचे कौतुक करत आहेत. त्याचवेळी हा जुगाड आपल्या देशाबाहेर जाऊ नये असे काहींचे म्हणणे आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्या लोकांनी हा व्हिडिओ पाहिला ते आश्चर्यचकित झाले.

हेही वाचलं का? 

 

View this post on Instagram

 

A post shared by THE FUNNY US 1M (@the.funny.us)

Back to top button