T20 Cricket : न्‍यूझीलंडच्‍या फलंदाजाची कमाल, २२ चेंडूत ठोकल्‍या ११० धावा | पुढारी

T20 Cricket : न्‍यूझीलंडच्‍या फलंदाजाची कमाल, २२ चेंडूत ठोकल्‍या ११० धावा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क
क्रिकेटमध्‍ये विक्रम होतात आणि ते मोडलेही जातात. आता न्‍यूझीलंडच्‍या फलंदाज मायकल ब्रेसवेल यानेही असाच एक नवा विक्रम आपल्‍या नावावर नोंदवला आहे. टी-20 लीगमध्‍ये ( T20 Cricket) त्‍यांनी केवळ २२ चेंडूत तब्‍बल ११० धावा ठोकल्‍या. त्‍याने ही कामगिरी करताना पाकिस्‍तानचा फलंदाज बाबर आजम याचा विक्रम तोडला आहे. तसेच या डावात तो १४१ धावांवर नाबाद राहिला. त्‍याच्‍या या कामगिरीमुळे न्‍यूझीलंडमधील क्रिकेट चाहते आवक झाले आहेत.

न्‍यूझीलंडमधील टी -20 लीग सुपर स्‍मॅशमध्‍ये वेलिंग्‍टन फायरबर्ड्‍स संघाचा कर्णधार मायकल ब्रेसवेल यांनी सेंट्रल डिस्‍ट्रिक्‍ट संघाविरोधातील सामन्‍यात दमदार फलंदाजी केली. ब्रेसवेल याने ६५ चेंडूत नाबाद १४१ धावांची धुवाधार खेळी केली. त्‍याने तब्‍बल ११ षटकार आणि ११ चौकार ठोकले. या अप्रतिम फटकेबाजीमुळे वेलिंग्‍टन फायरबर्ड्‍स संघ विजयी ठरला.

सेंट्रल डिस्‍ट्रिक्‍ट संघाने २० षटकांमध्‍ये वेलिंग्‍टन फायरबर्ड्‍स समोर २२८ धावांचे भलेमोठे लक्ष्‍य ठेवले होते. या लक्ष्‍याचा पाठलाग करताना वेलिंग्‍टन फायरबर्ड्‍सची सुरुवातीची अवस्‍था दयनीय झाली होती. केवळ ४३ धावांमध्‍ये ५ गडी तंबूत परतले होते. यानंतर ब्रेसवेल याने आपल्‍या तुफानी फलंदाजीने सारे चित्रच पालटले.एक चेंडू शिल्‍लक ठेवत संघाला विजय मिळवून दिला. ब्रेसवेल याने केवळ ४६ चेंडूत आपले शतक पूर्ण केले.

T20 Cricket: २२ चेंडूत ११० धावा

ब्रेसवेल याने ११ चौकार आणि ११ षटकार ठोकले. २२ चेंडूमध्‍ये त्‍याने चौकार मारत आपले शतक पूर्ण केले. त्‍याने ११० धावा केल्‍या त्‍यामध्‍ये ४४ धावा चौकाराने तर ६६ धावा षटकार लगावत केल्‍या. त्‍याच्‍या या खेळीवर सोशल मीडियावर धुमाकूळ घातल असून क्रिकेट फॅन कमेंट करत आहे. ब्रेसवल लवकरच न्‍यूझीलंडच्‍या राष्‍ट्रीय संघात स्‍थान मिळवेल, अशीही शक्‍यता व्‍यक्‍त केली जात आहे.

T20 Cricket: बाबर आजमचा विक्रम तोडला

ब्रेसवेल याने १४१ धावांवर नाबाद राहिला. या खेळीने त्‍याने एक विक्रम स्‍वत:च्‍या नावावर केला आहे. धावांचा पाठलाग करताना एवढी मोठी खेळी करणार तो पहिला कर्णधार ठरला आहे. त्‍याने पाकिस्‍तनाचा फलंदाज बाबर आजम याच्‍या नावावरील विक्रम तोडला आहे. कर्णधार बाबर आझम याने २०२१मध्‍ये दक्षिण आफ्रीकेविरोधातील टी-20सामन्‍यात धावांचा पाठलाग करताना १२२ धावा केल्‍या होत्‍या.
ब्रेसवेलला १४१ धावांवर नाबाद राहिला. त्‍याची ही खेळी तिसरी सर्वात मोठी खेळी ठरली आहे. यापूर्वी २०१४मध्‍ये धावांचा पाठलाग करता ल्‍यूक राइट याने १५३ धावांची खेळी केली होती. तर २०१५ मध्‍ये टी-20 स्‍पर्धेत वेस्‍ट इंडिजच्‍या ख्रिस गेल याने १५१ धावा फटकावल्‍या होत्‍या.
मायकल ब्रेसवेट याने केलेली फलंदाजी ही न्‍यूझीलंडमधील तिसरी मोठी खेळी ठरली आहे. यापूवॅ ब्रॅन्‍डन मॅककुलम याने २००८च्‍या आयपीएलमध्‍ये ७३ चेंडूत १५८ धावांची खेळी केली होती. तसेच २०१५च्‍या टी-२०ब्‍लास्‍टमध्‍ये मॅककुलम यानेच ६४ चेंडूत १५८ धावा केल्‍या होत्‍या.

हेही वाचलं का? 

Back to top button