बिहारच्या ‘या’ तरुणानं बनवलेलं Krishify अ‍ॅप देशातील शेतकऱ्यांना फायद्याचं ठरतयं | पुढारी

बिहारच्या 'या' तरुणानं बनवलेलं Krishify अ‍ॅप देशातील शेतकऱ्यांना फायद्याचं ठरतयं

आता शेतकरी सुध्दा ऑनलाईन जनावरांची विक्री करु शकतात. खरेदी करु शकतात. बियाणं, ट्रक्टर, अवजारं, खरेदी करु शकतात. एखाद्या शेतकऱ्याला जुन्या वस्तू विकाच्या असतील तर ते ऑनलाईन विकू शकतात. यासाठी आता शेतकऱ्यांसाठी नवीन अॅप सुरु झाले आहे.

बिहारमधील एका तरुणाने शेतकऱ्यांसाठी एक अॅप बनवले आहे. शेतकऱ्यांसाठी असलेलं हे अॅप देशातील पहिलं अॅप आहे. या अॅपच नाव आहे Krishify अ‍ॅप. शेतकऱ्यांना गाय, म्हैस विकायची असेल तर ते त्या अॅपवरुन विकू शकतात. ते खरेदी करु शकतात. शेतात फवारण्यासाठी औषध हवे असेल तर त्याचीही खरेदी, विक्री या अॅपवरुन करता येते. तसेच पिकांविषयी मार्गदर्शनही मिळते. हे अॅप विनामुल्य आहे.

अॅग्रीटेक स्टार्टअप Krishify अ‍ॅपने शेतकऱ्यांसाठी स्थानिक सोशल नेटवर्किंग, कृषी व्यवसाय आणि माहिती शेअरिंग प्लॅटफॉर्म उपलब्ध करुन दिला आहे. गेल्या महिन्यात त्या अॅपने 300 कोटी रुपयांचा GMV पार केला. या अॅपची सुरुवात बिहार मधून झाली. आता ते पूर्ण देशभर पोहचलयं.

अॅप बनणारा शेतकऱ्याचा मुलगा

हे अॅप बनणारा शेतकऱ्या मुलगा आहे. त्याच नाव राजेश रंजन. तो मुळचा बिहारचा आहे. राजेश रंजन हे आयआयटीचे विद्यार्थी आहेत. विद्यार्थी दशेपासून त्यांचे उद्योजक व्हायचे स्वप्न होते. २०१४ मध्येच बिहारमधील या मुलाने Instano, Dunzo सारख्या हायपरलोकल अॅप सुरु केले होते.

पुढं २०१५ मध्ये Instano, MagicTiger ने विकत घेतले, त्यानंतर राजेश कंपनीच्या उत्पादन विभागात काम करु लागले. नंतर राजेश रंजन यांनी ixigo आणि Analytics vidhya मध्ये काम केले. “डिजिटल उत्पादने तयार करणे आणि वाढीचे मार्ग शोधणे ही माझी ताकद होती.” असं राजेश रंजन सांगतात.

२०१८ च्या उत्तरार्धात भारतात इंटरनेटचा वापर वाढत होता. इंटरनेट वापरणाऱ्या नवीन पिढीसाठी काहीतरी नवीन तयार करण्याचा विचार राजेश यांच्या डोक्यात आलं. आणि राजेश यांनी नोकरी सोडून दिली. आणि Krishify अॅपचा इथूनचं खरा प्रवास सुरु झाला. राजेश रंजन यांच्या जोडीला अविनाश कुमार, मनीष अग्रवाल हे सुध्दा होते. या तिघांनी मिळून शेतकर्‍यांसाठी सोशल नेटवर्किंग, ट्रेडिंग आणि माहिती शेअरिंगसाठी प्लॅटफॉर्म सुरु केला. त्या अॅपच नाव Krishify.

राजेश रंजन सांगतात, आम्हाला काहीतरी वेगळ आणि खास तयार करायचं होतं. आणि शेती माझ्या माझ्या जवळची आहे, कारण मी शेतकरी कुटुंबातून आलो आहे. पुढं एक महिन्यानंतर ‘मे’ मध्ये गुरुग्राम-आधारित स्टार्टअपने ऑपरेशन सुरू करण्यासाठी ओरिओस व्हेंचर पार्टनर्स आणि अॅपीहाईकडून सीड फंडिंगमध्ये १५२,००० डॉलर जमा केले.

शेतकऱ्यांसाठी वन-स्टॉप नेटवर्किंग

Krishify अॅप शेतीविषयक सर्व घटकांना एकत्रित आणते. ज्यात सहकारी शेतकरी, व्यापारी, वितरक, शेती उपकरणे विक्रेते, पशुवैद्यक, वाहतूक सेवा देणारे या सगळ्यांना एका अॅपवर आणले आहे. या अॅपचे संस्थापक सीईओ राजेश रंजन सांगतात, “आम्ही ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे हाल समजून घेण्यासाठी बराच वेळ त्यांच्यासोबत घालवला आहे. सध्याच्या बाजारपेठेतील कंपन्या एकतर इनपुट-साइड किंवा पुरवठा साखळीत समस्या होत्या. आम्ही शेतकऱ्यांच्या जीवनचक्राच्या दृष्टिकोनातून समस्या पाहिल्या. त्यांना त्यांच्या बदलत्या गरजांनुसार अनेक भागधारकांसोबत काम करावे लागेल. यामध्ये पीक किंवा प्राण्यांच्या आरोग्याशी संबंधित कोणत्याही गरजा किंवा वाहतूक किंवा रोख गरजांचा समावेश असू शकतो.”

सध्याच युग हे डिजीटल युग आहे. पारदर्शकता आणि कार्यक्षमता निर्माण करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करू शकतो आणि शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांना योग्य लोकांशी जोडू शकतो.” असही ते म्हणाले. KrishiFi अॅप शेतकऱ्यांना कृषी बाजारपेठेत शेतमाल, जनावरे, खते, बियाणे, ट्रॅक्टर किंवा इतर उपकरणे खरेदी आणि विक्री यांसारख्या अनेक गोष्टी उपलब्ध करून देते. माती, पीक, हवामान आणि शेतीविषयी सल्ला मिळवता येतो. पीएम किसान योजनेसह इतर फायदेशीर सरकारी योजनांमध्ये, पशुवैद्य आणि पशुवैद्यकांशी संपर्क साधण्यासाठी यामुळे मदत होत आहे.

या अॅपमध्ये खरेदी आणि विक्री विभाग शेतकऱ्यांसाठी आहे. ज्यात वापरलेले ट्रॅक्टर, शेती उपकरणे किंवा जनावरे विकू शकतात. “तुम्हाला Krishify अॅपवर LinkedIn, Facebook आणि OLX चे फ्लेवर्स मिळतील. असही रंजन यांनी म्हटले आहे.

यावरुन सरकारी योजना काय सुरु आहेत. त्याचा फायदा कसा मिळवायचा. तसेच कृषी विमा या संबंधित माहिती यावर उपलब्ध आहे.

Krishify अॅपवर देशातील सर्व शेतकरी भेटू शकतात

कोणताही कृषी वितरक, किरकोळ विक्रेता किंवा घाऊक विक्रेते ज्यांना थेट शेतकऱ्यांना विक्री करायची आहे ते Krishify अॅप वापरून स्वतःचे ऑनलाइन स्टोअर सुरू करू शकतात. ते देशभरातील लाखो शेतकऱ्यांना विकण्यासाठी बियाणे, कीटकनाशके, खते आणि सेंद्रिय उत्पादनांपासून नर्सरी, पशुखाद्य आणि शेतातील यंत्रसामग्रीपर्यंत सर्व काही कॅटलॉग करू शकतात.

विकास आणि व्यवसायाचे मॉडेल

सुमारे दोन वर्षांत, Krishify अॅपने ३० लाख शेतकऱ्यांचे नेटवर्क तयार केले आहे, ज्यापैकी १६ लाख साप्ताहिक सक्रिय युजर्स आहेत. गेल्या ऑक्टोबरमध्ये दुग्धव्यवसाय आणि जनावरांचा व्यवसाय श्रेणी सुरु केल्यापासून शेतकरी-नेटवर्क दुप्पट झाले आहे. विशेष म्हणजे एखादा शेतकरी निरक्षर असल्यास त्याला यावर व्हाइस ओवरद्वारे माहिती उपलब्ध आहे.

“जनावरांची ऑनलाईन खेरदी-विक्रीसाठी प्लॅटफॉर्म उपलब्ध केल्यामुळे या अॅपचे युजर्स  वाढले आहेत. पशुवैद्यकांना पशू आरोग्य समस्यांसह स्थानिक शेतकऱ्यांना या अॅपद्वारे मदत करता येते. देशातील सर्व शेतकऱ्यांना एकत्रित आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत सध्या हिंदी भाषिक शेतकरी अॅप युजर्स जास्त आहेत आणि आता हे अॅप मराठी, तेलुगु भाषेतही हे अॅप उपलब्ध होईल, असेही रंजन सांगतात.

हेही वाचलत का?

Back to top button