पुणे : राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत पंजाब संघ विजेता | पुढारी

पुणे : राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत पंजाब संघ विजेता

पुणे : पुढारी वृत्तसेवा

हॉकी इंडियाच्या 11व्या वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत हॉकी पंजाबने विजेतेपद मिळविले. चुरशीच्या झालेल्या अंतिम लढतीत त्यांनी उत्तर प्रदेशचा शूटआऊटमध्ये 2-1 असा पराभव केला.

पुणे : ५० लाखांची खंडणी प्रकरण; माहिती अधिकार कार्यकर्ता सुधीर आल्हाटला अटक

नियोजित वेळेत दोन्ही संघ गोलशून्यची बरोबरी तोडू शकले नाहीत. त्यानंतर घेण्यात आलेल्या शूट आऊटमध्ये पंजाबने बाजी मारली. पंजाबकडून विशाल यादव, मेहकीत सिंग, तर उत्तर प्रदेशकडून केवळ महंमद अमीर खान यालाच गोल करण्यात यश आले. पंजाबकडून रणजोत सिंग, सिंग हरताज औजला यांना गोलरक्षकाला चकवण्यात अपयश आले. उत्तर प्रदेशकडून अजय यादव, महंमद सादिक, महंमद सैफ खान आणि तरुण अधिकारी हे खेळाडू संधी साधू शकले नाहीत.

पुणे : सतरा वर्षीय मुलाचा डोक्यात गोळ्या झाडून खून  

महाराष्ट्र चाैथ्या स्थानी

कर्नाटकने यजमान महाराष्ट्राचा 5-2 असा पराभव केला. सामन्याच्या तिसर्‍याच मिनिटाला यतिश कुमारने गोल करताना महाराष्ट्राचा गोलरक्षक आकाश चिकटेला चकवले. उत्तरार्धानंतर तालेबने आणखी एक गोल करून सामन्यात 2-2 अशी बरोबरी राखली.
सामन्याच्या 37 व्या मिनिटाला पवन मदिवलारने कर्नाटकला पुन्हा आघाडीवर नेले. सोमण्णा एन. डी. याने 45व्या मिनिटाला आघाडी भक्कम केली आणि 52 व्या मिनिटाला लिखित बीएमने गोल करून कर्नाटकचा विजय साकार केला.

हेही वाचा

करुणा धनंजय मुंडे यांच्याकडून नव्या पक्षाची घोषणा; परळीमध्ये निवडणूक लढवणार

चंद्रपूर : पट्टेदार वाघाकडून गाईची शिकार; गुराख्याने हुसकावले, पण वाघ पुन्हा आला

fully vaccinated : देशात ६० टक्‍क्‍यांहून अधिक लोकसंख्‍येचे पूर्ण लसीकरण

लुधियाना न्‍यायालयात स्‍फोट, २ ठार, चार गंभीर

भगर क्विंटलमागे दोन हजार, तर साबुदाणा 700 रुपयांनी महाग

Back to top button