पुढारी ऑनलाईन डेस्क
कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनच्या संकटाची चर्चा सुरु असतानाच एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. देशातील ६० टक्क्यांहून अधिक लोकसंख्येचे पूर्ण लसीकरण (कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस ) ( fully vaccinated ) झाले आहे.
१६ जानेवारी २०२१ राेजी देशात काेराेना लसीकरण माेहिमेला सुरुवात झाली हाेती. काेराेनाच्या दुसर्या लाटेचा माेठा परिमाण झाला. मागील काही महिन्यांमध्ये देशातील लसीकरणाचा वेग वाढला. आता देशातील ६० टक्क्यांहून अधिक लोकसंख्येचे पूर्ण लसीकरण (कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस ) ( fully vaccinated ) झाले आहेत.
देशात सध्या ओमायक्रॉनचे २३६ रुग्ण आढळले आहेत. यातील सर्वाधिक ६५ रुग्ण हे महाराष्ट्रातील आहेत. दिल्ली दुसर्या स्थानावर असून येथे ५७ रुग्ण आढळले आहेत. देशात आतापर्यंत ओमायक्रॉन संसर्ग झालेले १०४ रुग्ण पूर्ण बरे झाले आहेत, अशी माहिती आज सकाळी आरोग्य मंत्रालयाने दिली.
ओमायक्रॉनचा संसर्ग हा वेगाने होत असल्याचे विविध संशोधनात स्पष्ट झाले आहे. या प्रश्नी चचर्चा करण्यासाठी आज पंतप्रधान नरेंद्री मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे.
हेही वाचलं का?