Stock Market special session | शनिवारच्या स्पेशल ट्रेडिंग सत्रात सेन्सेक्स-निफ्टी वाढीसह बंद

बीएसई आणि एनएसई
बीएसई आणि एनएसई

पुढारी ऑनलाईन डेस्क : जागतिक सकारात्मक संकेतादरम्यान भारतीय शेअर बाजाराने शनिवारी (दि.१८) सलग तिसऱ्या दिवशी तेजीत व्यवहार केला. आजच्या विशेष ट्रेडिंगममध्ये (Stock Market special session) सेन्सेक्सने ७४ हजारांची पातळी गाठली. तर निफ्टीने २२,५०० चा टप्पा ओलांडला. सेन्सेक्स ८८ अंकांच्या वाढीसह ७४,००५ वर बंद झाला. तर निफ्टी ३५ अंकांनी किरकोळ वाढून २२,५०२ वर स्थिरावला. आज जवळपास २,३५९ शेअर्स वाढले. ९९८ शेअर्स घसरले. तर १३० शेअर्समध्ये कोणताही बदल दिसून आला नाही.

आजच्या विशेष ट्रेडिंग सत्रात सर्व क्षेत्रीय निर्देशांक वाढून बंद झाले. कॅपिटल गुड्स, पीएसयू आणि मीडिया हे यात आघाडीवर राहिले. मेटल, पीएसयू बँक, फार्मा, रियल्टी या निर्देशांकांनीही तेजीत व्यवहार केला.

बाजारातील घडामोडी

  • सेन्सेक्स, निफ्टी सलग तिसऱ्या सत्रात तेजीत बंद
  • सेन्सेक्स ८८ अंकांच्या वाढीसह ७४,००५ वर बंद
  • निफ्टीने २२,५०० चा टप्पा ओलांडला
  • आज जवळपास २,३५९ शेअर्स वाढले
  • ९९८ शेअर्स घसरले
  • १३० शेअर्समध्ये कोणताही बदल झाला नाही

आजचे ट्रेडिंग सत्र सकाळी ९:१५ ते सकाळी १० आणि ११:४५ ते दुपारी १२:४० पर्यंत अशा दोन सत्रात विभागले गेले होते. अनपेक्षित डिझास्टर हाताळण्याच्या तयारीची चाचणी घेण्यासाठी हे विशेष थेट ट्रेडिंग सत्र आयोजित केले होते. आजचे विशेष सत्र दोन सत्रांमध्ये झाले. जेथे इक्विटी आणि इक्विटी डेरिव्हेटिव्ह सेगमेंटमध्ये कमी कालावधीसाठी व्यवहार झाले.

पहिल्या सत्रात काय झाले?

पहिल्या विशेष ट्रेडिंग सत्रात सेन्सेक्स, निफ्टी सपाट पातळीवर स्थिरावले. सकाळी ९:१५ ते सकाळी १० दरम्यान झालेल्या पहिल्या सत्रात सेन्सेक्स ७३,९२१ वर खुला झाला. त्यानंतर त्याने ७४ हजारांचा अंकाला स्पर्श केला. पहिल्या सत्रात तो ४२ अंकांनी वाढून ७३,९५९ वर बंद झाला. तर निफ्टी १५ अंकांच्या किरकोळ वाढीसह २२,४८१ वर स्थिरावला.

पहिल्या सत्रात २,२३९ शेअर्स वाढले. तर ८३६ शेअर्समध्ये घसरण दिसून आली. ११० शेअर्समध्ये कोणताही बदल झाला नाही. क्षेत्रीय पातळीवर कॅपिटल गुड्स, मीडिया हे निर्देशांक आघाडीवर राहिले. हे १ टक्क्याने वाढले.तर मेटल, पीएसयू बँक, फार्मा आणि रियल्टी हेही तेजीत राहिले.

कोणते शेअर्स वधारले?

आजच्या विशेष सत्रात सेन्सेक्सवर नेस्ले इंडियाचा शेअर्स टाॅप गेनर होता. हा शेअर्स २ टक्क्यांनी वाढून २,५०० रुपयांच्यावर पोहोचला. त्याचबरोबर टाटा मोटर्स, एचसीएल टेक हे शेअर्स वाढले. तर जेएसडब्ल्यू स्टील, एम अँड एम, अल्ट्राटेक सिमेंट या शेअर्समध्ये घसरण दिसून आली.

निफ्टीवर नेस्ले इंडिया, पॉवरग्रिड, ओएनजीसी, हिंदाल्को हे शेअर्स तेजीत राहिले. तर जेएसडब्ल्यू स्टील, एम अँड एम, अल्ट्राटेक सिमेंट, टायटन या शेअर्समध्ये किरकोळ घसरण झाली.

दसऱ्या सत्रातील ट्रेडिंग

दुसऱ्या सत्रात सेन्सेक्स आणि निफ्टी सपाट पातळीवर खुले झाले. त्यानंतर सेन्सेक्स १०० अंकांनी वाढला आणि तो ८८ अंकांच्या वाढीसह बंद झाला. तर निफ्टी ३५ अंकांनी किरकोळ वाढून २२,५०२ वर बंद झाला.

sensex closing
sensex closing

Nifty 50

परदेशी गुंतवणूकदार खरेदीकडे वळले

एक्सचेंज डेटानुसार, परदेशी संस्थागत गुंतवणूकदार (FIIs) शुक्रवारी भारतीय शेअर बाजारात निव्वळ खरेदीदार बनले. त्यांनी १,६१६.७९ कोटी रुपयांच्या शेअर्सची खरेदी केली आहे.

जागतिक बाजारात काय स्थिती?

अमेरिकेच्या बाजारातील डाऊ जोन्स इंडस्ट्रियल ॲव्हरेज १३४ अंकांनी वाढून पहिल्यांदाच ४० हजार पार झाला. या आठवड्यात डाऊन जोन्स १.२ टक्क्यांनी वाढला आहे. तर एस अँड पी ५०० निर्देशांक १.५ टक्के आणि नॅस्डक २.१ टक्क्यांनी वाढला आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला आलेल्या आकडेवारीने एप्रिलमध्ये ग्राहकपयोगी वस्तूंचे दर कमी होत असल्याचे दर्शविल्याने अमेरिकेची फेडरल रिझर्व्ह यावर्षी दोनवेळा व्याजदरात कपात करणार असल्याची आशा निर्माण झाली आहे. यामुळे येथील बाजारात तेजीचे वातावरण राहिले.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news