'जय भवानी जय शिवाजी' मालिकेत विशाल निकम साकारणार शिवा काशिद
मुंबई; पुढारी वृत्तसेवा: ‘जय भवानी जय शिवाजी’ मालिकेत अभिनेता विशाल निकम छत्रपती शिवाजी महाराजांचा जिगरबाज मावळा शिवा काशिद साकारणार आहे. ‘जय भवानी जय शिवाजी’ ही मालिका २६ जुलैला चाहत्यांच्या भेटीस येत आहे.
छत्रपती शिवाजी महाराज हे नाव जरी उच्चारलं तरी उर अभिमानाने भरुन येतो. रयतेचा राजा कसा असावा याचा पायंडा छत्रपती शिवरायांनी रचला आणि जाणत्या राजाच्या स्वराज्य स्थापनेच्या स्वप्नपूर्ततेसाठी हजारो शिलेदारांनी जीव ओवाळून टाकला. शिलेदारांच्या शौर्याची गोष्ट सांगणारी ‘जय भवानी जय शिवाजी’ मालिका २६ जुलैपासून रात्री १० वाजता स्टार प्रवाहवर सुरु होत आहे.
अधिक वाचा
- जर्मनी, बेल्जिअम, नेदरलँड देशांत महापुराचा हाहाकार
- धर्मांतर प्रकरणात उत्तर प्रदेश एटीएसने नागपुरातून तिघांना केली अटक
छत्रपती शिवरायांची भूमिका भूषण प्रधान, बाजीप्रभू देशपांडेंच्या रुपात अजिंक्य देव आणि नेतोजी पालकरांची भुमिका कश्यप परुळेकर साकारणार आहे. तसेच अभिनेता विशाल निकमने छत्रपती शिवाजी महाराजांचा जिगरबाज मावळा शिवा काशिद यांची भूमिका साकारणार आहे.
अधिक वाचा
- भुसावळ : हद्दपार आरोपीनेच मित्राला क्रूरपणे संपविले; आरोपीला अटक
- ‘पायवाटेची सावली’ येतोय यंदाच्या दिवाळीला!
जिगरबाज मावळा शिवा काशिद
शिवा काशिद हे स्वराज्याच्या इतिहासातलं महत्त्वाचं पान. शिवरायांचा हा जिगरबाज मावळा हुबेहुब शिवरायांसारखा दिसायचा असं म्हटलं जातं. महाराजांची पन्हाळ गडावरुन सुटका करण्यासाठी शिवा काशिद यांनी छत्रपती शिवरायांचं सोंग घेऊन आपल्या राजाचा जीव वाचवला होता. जिगरबाज शिवा काशिद यांच्या शौर्याची गाथा साकारण्यासाठी अभिनेता विशाल निकम सज्ज झाला आहे.
या मालिकेतल्या भूमिकेविषयी सांगताना विशाल निकम म्हणाला, ‘स्टार प्रवाहने दिलेल्या या संधीसाठी मी खूपच आभारी आहे. याआधी स्टार प्रवाहच्या ‘साता जल्माच्या गाठी’ आणि ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ मालिकेवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं आहे. आता ‘जय भवानी जय शिवाजी’ मध्ये शिवा काशिद साकारण्याची जबाबदारी आहे.
अधिक वाचा
शिवा काशिद यांची शौर्याची कामगिरी
स्वराज्य हे एकचं स्वप्न उराशी बाळगून हजारो मावळ्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. याच लढवय्या मावळ्यांची गोष्ट या मालिकेतून उलगडणार आहे. इतिहास जिवंत होतोय असं म्हटलं तरी चालेल.
शिवा काशिद यांच्या शौर्याविषयी आपण ऐकलं आहे. या मालिकेच्या निमित्ताने ते प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. मी या नव्या भूमिकेसाठी खूपच उत्सुक आहे. अशी भावना विशाल निकम याने व्यक्त केली.’
स्टार प्रवाह प्रस्तुत या मालिकेची निर्मिती दशमी क्रिएशन्सची आहे. २६ जुलैपासून रात्री १० वाजता छत्रपती शिवरायांच्या शिलेदारांची ही गोष्ट भेटीला येणार आहे. पाहायला विसरु नका नवी ऐतिहासिक मालिका ‘जय भवानी जय शिवाजी’ फक्त स्टार प्रवाहवर.
हेही वाचलंत का?
- पवारांचा हात आहे म्हणून मुख्यमंत्री शिवसेनेचा : खासदार अमोल कोल्हे
- देवेंद्र फडणवीस यांचे राज ठाकरेंबद्दल सूचक वक्तव्य
- अभिनेत्री उर्मिला निंबाळकरने प्रेग्नेंसीवरून ट्रोल करणाऱ्यांना सुनावलं
पाहा : “ब्रा आणि बुब्ज वर मी बोलले कारण…” | हेमांगी कवी