देवेंद्र फडणवीस यांचे राज ठाकरेंबद्दल सूचक वक्तव्य | पुढारी

देवेंद्र फडणवीस यांचे राज ठाकरेंबद्दल सूचक वक्तव्य

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : मनसे सोबतच्या संभाव्य युतीबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सूचक विधान केले आहे. राज्यातील मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मनसे आणि भाजपच्या संभाव्य युतीबाबत चर्चा सुरू झाली आहे. देवेंद्र फडणवीस यांनीही या चर्चेबाबत शनिवारी खुलासा केला.

अधिक वाचा :

याबाबत योग्यवेळी निर्णय होईल. असे आज देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरात म्हटल आहे. फडणवीस शनिवारी (दि. १७)सकाळी दिल्लीहून नागपूरला दाखल झाले.

नागपूर विमानतळावर येताच प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना दिल्लीवारीबाबत आणि यावेळी मनसेसोबत मुंबई महापालिकेत युती होणार का? असा सवाल केला. त्यावर, योग्यवेळी योग्य निर्णय होईल, असं सूचक विधान फडणवीस यांनी केलं. त्यामुळे भाजप आणि मनसे एकत्र येणार का? या चर्चेने पुन्हा एकदा जोर धरला आहे.

अधिक वाचा :

केंद्रात कामं असतात त्यासाठी जावं लागतं. त्याचा राजकीय अर्थ काढू नये, असं सांगतानाच केंद्रात नवीन मंत्री झाले आहेत. त्यांना भेटून शुभेच्छा दिल्या. असंही फडणवीस यांनी सांगितलं.

तसेच ओबीसी आरक्षणाचा अधिकार हा राज्यालाच आहे. केंद्राला नाही. असंही त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं.

अधिक वाचा :

मनसेने परप्रांतीयांबाबतचा मुद्दा सोडला तर त्यांच्याशी युती होऊ शकते, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. याकडे फडणवीसांचं लक्ष वेधण्यात आलं.

त्यावर, मनसेसोबत युती करण्याचा निर्णय योग्यवेळी होईल. अजून त्याला वेळ आहे, असं फडणवीस यांनी सांगितलं.

चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य तुम्ही पूर्णपणे समजून घेत नाही. अर्धवट समजून घेता, असंही त्यांनी म्हटलंय.

मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप आणि मनसे यांची युती होणार नसल्याचं बोललं जात आहे. असे झाल्यास मुंबई महापालिका निवडणूक बहुरंगी होण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा :

Back to top button