‘पायवाटेची सावली’ येतोय यंदाच्या दिवाळीला! | पुढारी

'पायवाटेची सावली' येतोय यंदाच्या दिवाळीला!

मुंबई; पुढारी ऑनलाईन: आध्यात्मिक मनोरंजनसोबत प्रबोधन करणारा ‘पायवाटेची सावली’ हा चित्रपट लवकरच चाहत्यांच्या भेटीस येत आहे.

सध्याच्या कोरोना महामारीच्या काळात शारीरिक तंदुरुस्तीसोबत मनाची मशागत करणे गरजेचे आहे. खरंतर मानसिक आरोग्य जपण्याबाबत अगोदरपासूनच बोलले जात होते. परंतु, कोरोना कालखंडात याचे महत्त्‍व अधिक वाढले आहे.

सध्यस्थितीत जागतिक आर्थिक मंदी आल्यामुळे सामान्यांचे हाल होत आहेत. नोकऱ्या गेल्यामुळे पैश्यांची चणचण भासत आहे. त्यामुळे सामाजिक आर्थिक चक्र कोलमडले आहे.या सर्वांचा थेट परिणाम मनावर होतोय आणि बऱ्याच जणांना मानसिक आजाराने जखडले आहे. अनेकजण आर्थिक कोंडीतून बाहेर निघण्याचे मार्ग शोधताहेत. परंतु, त्यामुळे मानसिक खच्चीकरण होताना दिसत आहे.

अधिक वाचा 

हाच धागा पकडत प्रसिद्ध लेखक, निर्माते आणि दिग्दर्शक मुन्नवर भगत यांनी आगामी सिनेमा ‘पायवाटेची सावली’ बनविला आहे.

मराठी आणि हिंदीमध्ये हा चित्रपट आहे. नुकतेच या चित्रपटाचे चित्रीकरण संपले असून पोस्ट-प्रॉडक्शनचे काम सुरु झाले आहे.त्रिशा स्टुडिओमध्ये चित्रपटावर बाह्यनिर्मितीचे संस्कार होत असून, येत्या दिवाळीला हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्मात्यांचा मानस आहे.

चित्रपटाची कथा

‘शोधून थकून गेला मुसाफिर, मग पायवाटेवर भेटली सावली’ या कवितेच्या ओळीत ‘पायवाटेची सावली’ या चित्रपटाचे सार आहे.

चित्रपटातील नायक हा परोपकारी आणि सद्गुणी असून वाईट गोष्टींच्या सावलीतही तो उभा राहत नाही.तत्ववादी लोकांचे, बऱ्याचदा, घडते त्याप्रमाणे त्याची नोकरी जाते. कमाईचे बाकी काहीही स्रोत नसल्यामुळे तो हळूहळू नैराश्याच्या गर्तेत जातो.

अधिक वाचा  

त्यातच त्याची पत्नी त्याच्याकडे सतत पैशांचा तगादा लावत असते. तिच्या साध्यासुध्या इच्छाही आपण पूर्ण करू शकत नाही या भावनेने तो स्वत: ला हरवून बसलो. त्याच्या मनात आत्महत्येचे विचार घोंघावू लागतात.

त्यावेळी परमेश्वर त्याच्या जीवनात प्रवेश करतो  मग पुढे त्याच्या जीवनात प्राक्तनामुळे जे बदल घडतात त्याची मीमांसा चित्रपटातून केली गेली आहे.

अधिक वाचा  

‘निवडुंग’,‘गाव पुढे आहे’ सारखे चित्रपट बनविणारे निर्माते, दिग्दर्शक मुन्नवर भगत यांनी ‘पायवाटेची सावली’ चे दिग्दर्शन केले आहे. चित्रपटाचे लेखन, संवाद, पटकथा आदी त्यांचेच असून चित्रपटाची निर्मितीही त्यांनीच केली आहे.

या चित्रपटातून रेवती अय्यर हा नवा चेहरा चित्रपटसृष्टीत पदार्पण करीत आहे.डीओपी अरविंदसिंह पुवार तर संगीत अमित बिस्वास यांनी दिले आहेत.चित्रपटाच्या संकलनाची जबाबदारी सुबोध नारकर यांनी सांभाळली आहे.

थोडक्यात, ‘पायवाटेची सावली’ हा चित्रपट आध्यात्मिक मनोरंजन देणारा असून मनोरंजनासोबत प्रबोधनही करतो.

हेही वाचलंत का? 

पाहा : “ब्रा आणि बुब्ज वर मी बोलले कारण…” | हेमांगी कवी 

Back to top button