नगर : श्रीगोंदाच्या माजी नगराध्यक्षा श्यामला ताडे यांची आत्महत्या | पुढारी

नगर : श्रीगोंदाच्या माजी नगराध्यक्षा श्यामला ताडे यांची आत्महत्या

श्रीगोंदा (जि. नगर), पुढारी ऑनलाइन

श्रीगोंदा नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा श्यामला मनोज ताडे (वय ४०) यांनी आज (दि. २०) पहाटेच्या सुमारास आपल्या राहत्या घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. ताडे यांच्या आत्महत्येची बातमी समोर येताच शहरात एकच खळबळ उडाली. याप्रकरणी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून य पुढील तपास श्रीगोंदा पोलिस करत आहेत.

श्रीगोंदा शहराचे नगराध्यक्ष पद भूषविलेल्या श्यामला मनोज ताडे यांनी राहत्या घरामध्ये फॅनला साडी अडकवून आत्महत्या केली. याबाबत किरण दगडू ताडे यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात वर्दी दिली. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

श्यामला ताडे या श्रीगोंदा नगरपालिकेमध्ये अडीच वर्ष नगराध्यक्ष पदावर कार्यरत होत्या. अनुसूचित जाती प्रवर्गातून आरक्षित जागेवर त्या निवडून आल्या होत्या. सदरील घटना धनश्री अपार्टमेंट श्रीगोंदा येथे त्यांच्या राहत्या घरात घडली आहे.

पोलीस कर्मचारी विकास वैराळ यांनी या घटनेनंतर अकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांनी घटनास्थळी भेट दिली असून, पुढील तपास पोलीस कर्मचारी भारत खारतोडे करत आहेत.

हेही वाचा

Back to top button