पुणे : पैशांसाठी एकाच कुटुंबातील चार जणांचा निर्घृण खून करणार्‍यास फाशी  | पुढारी

पुणे : पैशांसाठी एकाच कुटुंबातील चार जणांचा निर्घृण खून करणार्‍यास फाशी 

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुण्यातील कल्याणीनगर भागात असलेल्या प्रिन्स्टन टाऊन सोसायटीमध्ये तेरा आणि नऊ वर्षांच्या मुलींसह पती-पत्नीची हत्या केल्याप्रकरणात मुख्य आरोपी भागवत बाजीराव काळे (वय 47, रा. भूम, जि. उस्मानाबाद) यास न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली. सत्र न्यायाधीश बी. पी. क्षीरसागर यांनी हा आदेश दिला. गुन्हा घडला त्यावेळी काळे हा 22 वर्षांचा होता. मागील बारा वर्षांपासून तो फरारी होता.

पुणे महापालिकेची प्रारूप प्रभाग रचना फुटली!, उच्च न्यायालयात याचिका दाखल

याप्रकरणात, भागवत काळे याला यापुर्वीच अटक झाली होती. खटला सुरू असताना त्याला येरवडा तुरूंगात नेत असताना त्याने पोलिस व्हॅनमधून पळ काढला होता. तब्बल 12 वर्षांनी तो सापडला. त्यानंतर, खटल्याची सुनावणी सुरू झाली. यादरम्यान, अनेक साक्षीदार, तपासी अधिकारी अशा 20 जणांचे निधन झाले. खटल्याचा निकाल होईपर्यंत पंचांचेही निधन झाले आहे.

पुणे : पती पत्नीला कार चालवण्यास शिकवताना विहिरीत कोसळली; पत्नीचा जागीच मृत्यू

न्यायालयातील युक्तिवादादरम्यान सरकारी वकील राजेश कावेडिया यांनी आरोपीने केलेला गुन्हा हा दुर्मिळातील दुर्मिळ स्वरुपाचा आहे. त्याने दोन लहान जिवांचा निर्दयीपणे खून केला आहे. चिमुकल्यांच्या अंगावर जवळपास बारा ते वीस जखमा होत्या. खून झालेल्या महिलेचे दातही आरोपींनी तोडले असून, त्यांनी मुलगी व रमेश पाटील यांचा मृतदेह इमारतीच्या ड्रेनेजमध्ये कोंबला होता. आरोपींनी पैशांसाठी एका कुटुंबालाच संपविले आहे. त्यांनी एक दोन नव्हे तर चार खून केल्याने त्याला फाशीची शिक्षाच योग्य असल्याचा युक्तिवाद केला. न्यायालयाने तो ग्राह्य धरत आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली.

44 हजार घरांच्या गच्चीवर झाली 811 मेगावॅट वीजनिर्मिती

 

Back to top button