प्रियंका चतुर्वेदी यांच्‍यापाठोपाठ शशी थरुर यांचाही सांसद टीव्‍ही अँकरपदाचा राजीनामा | पुढारी

प्रियंका चतुर्वेदी यांच्‍यापाठोपाठ शशी थरुर यांचाही सांसद टीव्‍ही अँकरपदाचा राजीनामा

नवी दिल्‍ली; पुढारी ऑनलाईन: प्रियंका चतुर्वेदी यांच्‍या पाठोपाठ काँग्रेसचे ज्‍येष्‍ठ नेते शशि थरुर ( Shashi Tharoor ) यांनीही सांसद टीव्‍हीच्‍या अँकरपदाचा राजीनामा दिला आहे. त्‍यांनीही खासदारांच्‍या निलंबन प्रश्‍नी राजीनामा देण्‍याचा निर्णय घेतला आहे.

१५ सप्‍टेंबर २०२१ रोजी लोकसभा आणि राज्‍यसभा चॅनेलचे एकत्रीकरण करुन सांसद टीव्‍ही हे चॅनेल सुरु करण्‍यात आले होते. या चॅनेलवर विद्‍यमान व माजी खासदारांना अँकरिंगची जबाबदारी होती. यामध्‍ये शशि थरुर ( Shashi Tharoor ), माजी खासदार आणि काँग्रेसचे ज्‍येष्‍ठ नेते कर्ण सिंह आणि शिवसेनेच्‍या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांचा समावेश होता.

पावसाळी अधिवेशनात १२ खासदारांना निलंबित करण्‍यात आले होते. हिवाळी अधिवेशन सुरु झाले तरी ही कारवाई कायम ठेवली होती. याच्‍या निषेधार्थ शिवसेनेच्‍या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी रविवारी सांसद टीव्‍हीवरील मेरी कहानी कार्यकम्राच्‍या अँकर पदाचा राजीनामा दिला होता. हा कार्यकम्र देशातील महिला खासदारांच्‍या प्रवासाविषयक होता.

काँग्रेस खासदार शशी थरुर यांनी युएन टेलिव्‍हिजनसाठी हॉलीवूड अभिनेता मायकल डग्‍लस व अन्‍य सेलिब्रिटींच्‍या मुखलाखती घेतल्‍या होत्‍या. सांसद टीव्‍हीवरही ‘टू द प्‍वाइंट’कार्यक्रमाच्‍या अँकरिंगची जबाबदारी त्‍यांच्‍यावर होती. मात्र या कार्यक्रमाचे अँकरिंग करणार नसल्‍याचे थरुर यांनी स्‍पष्‍ट केले आहे. राज्‍यसभेमधून खासदारांच्‍या झालेल्‍या निलंबनप्रकरणावर नाराजी व्‍यक्‍त करत त्‍यांनी हा निर्णय घेतला असल्‍याचे सूत्रांनी सांगितले.

हेही वाचलं का? 

 

 

Back to top button