Picture Perfect : ‘या’ फोटोत २ देश, ४ खेळाडू आणि २ नावे आहेत, तुम्ही काय कॅप्शन द्याल? | पुढारी

Picture Perfect : ‘या’ फोटोत २ देश, ४ खेळाडू आणि २ नावे आहेत, तुम्ही काय कॅप्शन द्याल?

पुढारी ऑनलाईन डेस्क : Picture Perfect IND vs NZ : मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात ‘भारतीय खेळाडूंनी’ वर्चस्व गाजवले. इंथ फक्त टीम इंडियाच्या भारतीय खेळाडूंबद्दल चर्चा जरायची नाहिय तर पाहुण्या न्यूझीलंड संघातील भारतीय खेळाडूंचाही उल्लेख महत्त्वाचा आहे. भारत हा क्रिकेट प्रिय देश आहे. नुकत्याच झालेल्या भारत विरुद्ध न्यूझीलंड कसोटी मालिकेत दोन भारतीयांनी चमकदार कामगिरी केली. ते दोघे सातासमुद्रापार राहत असले तरी ते मूळ भारतीय आहेत. कसोटी मालिकेतील शानदार प्रदर्शन करून त्यांनी त्यांच्याही रक्तात क्रिकेट सळसळतय हे सिद्ध केलंय. मुंबई कसोटी संपल्यानंतर सध्या एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात चार खेळाडू एका ओळीत पाठमोरे उभे आहेत. त्या चौघांच्या पाठीवरील नावे आपल्याला दिसतात.

Image

खरं तर, न्यूझीलंडकडून गोलंदाज एजाज पटेलने संपूर्ण सामन्यात १४ विकेट्स आपल्या नावावर केल्या. न्यूझीलंडकडून जरी खेळत असला तरी तो जन्माने मुंबईकर म्हणजेच भारतीय आहे. दुसरा किवी खेळाडू रचिन रवींद्र होता ज्याने पहिल्या सामन्यात किवी संघाला पराभवापासून वाचवले आणि वानखेडेवर दुसऱ्या डावात ३ बळीही घेतले. या दोन्ही खेळाडूंची भारतात बरीच चर्चा सुरू आहे. (Picture Perfect IND vs NZ)

भारताने न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिका १-० ने जिंकली आहे, मग तुम्हाला प्रश्न पडत असेल त्या एजाज आणि रचिनची चर्चा आता कशाला? तर तुम्हाला त्यामागचं कारण सांगणे आमचं काम आहे… झालं असं की, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI)ने आपल्या ट्विटर अकाउंटवरून एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये चार खेळाडू पाठमोरे उभे असल्याचे दिसत आहे. हे चार खेळाडू मिळून त्यांच्या जर्सीमधून दोन नावे निर्माण होतात. या चौघांमधील दोघे भारतीय आणि दोघे न्यूझीलंड खेळाडू आहेत. (Picture Perfect IND vs NZ)

हा फोटो डावीकडून उजवीकडे पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की, या फोटोत अक्षर पटेल उभा आहे आणि त्याच्या जर्सीवर ‘अक्षर’ लिहिलेले आहे, त्याच्यानंतर एजाज पटेल उभा आहे ज्यांच्या जर्सीवर ‘पटेल’ लिहिलेले आहे, त्यानंतर रचिन रवींद्र आहे. त्याच्या जर्सीवर ‘रवींद्र’ लिहिले आहे आणि त्याच्या पुढे रवींद्र जडेजा आहे ज्यांच्या जर्सीवर ‘जडेजा’ लिहिले आहे. अशा प्रकारे चार खेळाडूंच्या जर्सीमधून दोन नावे तयार होत आहेत. ती दोन नावे आहेत अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजा. त्यामुळे हा फोटो वेगवेगळ्या कॅप्शनसह सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो रविचंद्रन अश्विनने क्लिक केल्याचे सांगितले जात आहे. हा फोटो शेअर करत ICC ने याचे वर्णन परफेक्ट क्लिक असे केले आहे. यावर अनेकजण मजेशीर कॅप्शनही देत ​​आहेत. कोणी कुंभमेळ्याचे भाऊ सांगत आहेत तर कोणी वॉशिंग पावडरच्या धुलाईतील फरक, असे विनोद करत आहेत. आता तुम्हीही ठरवा या फोटोला काय कॅप्शन द्यायचे आहे. (Picture Perfect IND vs NZ)

Back to top button