नागालँडमध्ये १४ स्थानिकांना अतिरेकी समजून लष्कराने ठार मारले ; अमित शहांकडून निवेदन | पुढारी

नागालँडमध्ये १४ स्थानिकांना अतिरेकी समजून लष्कराने ठार मारले ; अमित शहांकडून निवेदन

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन

नागालँडमध्ये लष्कर आणि पोलिसांमध्ये झालेल्या संघर्षासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज लोकसभेत निवेदन दिले. गोळीबाराबद्दल खेद व्यक्त करत त्यांनी चुकीच्या ओळखीमुळे ही घटना घडल्याचे सांगितले. या प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले असून राज्यात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असल्याचे ते म्हणाले.

नागालँड पोलीसांनी भारतीय लष्कराच्या २१ पॅरा स्पेशल फोर्सच्या तुकडीची स्वत:हून दखल घेत एफआयआर नोंदवला आहे. ज्यामध्ये आतापर्यंत एकूण १४ गावकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर गावकऱ्यांसोबत झालेल्या चकमकीत लष्कराच्या एका जवानाचाही मृत्यू झाला आहे.

एफआयआरमध्ये, नागालँड पोलिसांनी स्पष्टपणे नमूद केले आहे की पॅरा स्पेशल फोर्सने स्थानिक पोलिसांना माहिती दिली नव्हती किंवा कोणताही पोलिस मार्गदर्शक घेतला नव्हता, त्यामुळे ही ‘चुकीची ओळख’ असल्याचे लष्कराचे म्हणणे आहे. एफआयआरमध्ये पोलिसांनी “नागरिकांना मारण्याचा आणि जखमी करण्याचा सुरक्षा दलाचा हेतू” असे नमूद केले आहे.

म्यानमारच्या सीमेला लागून असलेला नागालँडचा MON जिल्हा AFSPA कायद्याखाली आहे, त्यामुळे केंद्र सरकारने परवानगी दिल्याशिवाय लष्करावर कारवाई करता येणार नाही. आर्मी स्पेशल फोर्सवर हत्येचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

हे  ही वाचलं का ?

Back to top button