

नवी दिल्ली :पुढारी ऑनलाईन
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा काय करतायत? अशी विचारणा करत नागालँडमधील हिंसाचाराप्रकरणी केंद्र सरकारने खुलासा करावा, अशी मागणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज केली.
नागालँडमध्ये सुरक्षा दलाच्या दहशतवादविरोधी कारवाईत अनेक स्थानिकांचा मृत्यू झाला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांची संख्या १३ वर गेली आहे. यात एका सुरक्षा दलाच्या जवानाचाही समावेश आहे.
या घटनेबाबत प्रतिक्रिया देताना राहुल गांधी ट्विटरवर म्हटलं आहे की, नागालँडमधील घटना ही ह्दयद्रावक आहे. या घटनेवर केंद्र सरकारनेवस्तुनिष्ठ माहिती समोर आणणे आवश्यक आहे. सध्या केंद्रीय गृहमंत्री काय करत आहेत? आपल्या देशातील जमिनीवर सर्वसामान्य नागरिकांबरोबर सुरक्षा दलाचे जवान तरी सुरक्षित आहेत का, असा सवाल त्यांनी केला आहे.