LokSabha Elections : आ. रोहित पवारांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क! | पुढारी

LokSabha Elections : आ. रोहित पवारांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क!

बारामती : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात आज (दि.७) १० राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील ९३ जागांसाठी मतदान होत आहे. बारामती लोकसभा मतदारसंघासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनीदेखील मतदान केलं. यावेळी त्यांनी आपल्या बारामतीमधील गावी म्हणजेच पिंपळी या गावी मतदान केलं. बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार निवडणूक रिंगणात आहेत. आ. रोहित पवार यांच्यासोबतच  त्यांच्या पत्नी कुंती पवार, वडील राजेंद्र पवार, आई सुनंदा पवार यांनी सुध्दा  मतदानाचा हक्क बजावला.  सकाळी ७ वाजेपासून मतदानास सुरुवात झाली. दरम्यान, राज्यातील सर्वात लक्षवेधी असणाऱ्या बारामती लोकसभा मतदार संघात आजच मतदान होत आहे.

हेही वाचा

Back to top button