परभणी : पिंपळभत्या येथे दुचाकींची धडक; ३ तरुण गंभीर जखमी

परभणी : पिंपळभत्या येथे दुचाकींची धडक; ३ तरुण गंभीर जखमी

पुर्णा, पुढारी वृत्तसेवा : पूर्णा-नांदेड या मुख्य रोडवर असलेल्या पिंपळभत्या जवळ दोन दुचाकींची धडक होवून अपघात झाल्याची घटना रविवारी (दि.2) समोर आली आहे. या अपघातात वाहनांची समोरासमोर धडक झाल्याने दोघेही दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले आहेत.

या धडकेत पिंपळगाव बाळापूर येथील सटवाजी नारायण घाटोळ आणि मोतीराम तुकाराम घाटोळ यांच्या वाहनाला विरुध्द दिशेने भरधाव वेगात येणाऱ्या विजय वाघरे या तरुणाच्या दुचाकीने जोराची धडक दिली. या धडकेत घाटोळ आणि वाघरे गंभीर जखमी झाले आहेत. घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी रुग्णवाहिका बोलावून जखमींना नांदेड येथील रूग्णालयात हलविण्यात आले. यानंतर चुडावा पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच या घटनेचा अधिक तपास चुडावा पोलीस करत आहेत.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news