देवेंद्र फडणवीस यांची शुक्रवारी राजापुरात सभा | पुढारी

देवेंद्र फडणवीस यांची शुक्रवारी राजापुरात सभा

राजापूर; पुढारी वृत्तसेवा : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शुक्रवारी (दि.२६) राजापुरात येणार आहेत. राजापुरातील राजीव गांधी स्टेडियमवर सायंकाळी तीन वाजता त्यांची जाहीर प्रचारसभा होणार असल्याची माहिती रत्नागिरी -सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघांचे भाजपचे प्रभारी व माजी आमदार प्रमोद जठार यांनी पत्रकारांना दिली.

रत्नागिरी -सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून महायुतीच्या वतीने भाजपाने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रिंगणात उतरविले आहे. त्यांच्या विजयासाठी एनडीएने जोरदार कंबर कसली असून महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून मतदारसंघ पिंजून काढला जात आहे.
राजापुरात शुक्रवारी होणाऱ्या सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत, सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, शिवसेना नेते किरण सामंत, राष्ट्रवादीचे या लोकसभा मतदारसंघांचे समन्व्यक अजित यशवंतराव यांच्यासह महायुतीतील सर्व घटक पक्षांचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित राहणार आहेत, अशीही माहिती भाजपचे प्रभारी प्रमोद जठार यांनी दिली. फडणवीस यांची सभा आयोजित करण्यात आल्यामुळे गुरुवारी (दि.२५) राजापुरातील आडीवरे आणि पाचल येथील पूर्वनियोजीत सभा रद्द करण्यात आल्या आहेत, असेही जठार यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा : 

Back to top button