AAP Election Campaign : ‘जेल का जवाब वोट से’ लोकसभेसाठी आपची मोहीम | पुढारी

AAP Election Campaign : 'जेल का जवाब वोट से' लोकसभेसाठी आपची मोहीम

पुढारी ऑनलाईन डेस्क : लोकसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाने (आप) प्रचार सुरू केला आहे. ‘जेल का जवाब वोट से’ (Jail Ka Jawaab Vote Se) या मोहिमेअंतर्गत ‘आप’ने अनेक ठिकाणी पोस्टर लावले आहेत. आपने जारी केलेल्या पोस्टरमध्ये मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना तुरुंगात दाखवण्यात आले आहे. केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ आपने ‘जेल का जवाब वोट से’ मोहीम सुरू केली असून लोकांना सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. (AAP Election Campaign)

केजरीवाल यांचे ध्येय पुढे नेणे ही आमची जबाबदारी आहे. ‘जेल का जवाब वोट से’ (Jail Ka Jawaab Vote Se) ही मोहीम सुरू केली आहे. ज्या दिवशी मतदान होईल, त्या दिवशी केजरीवाल यांना तुरुंगात टाकण्याचे उत्तर कळेल. या मोहिमेअंतर्गत घरोघरी जाऊन जनतेशी संवाद साधणार असल्याचे या मोहिमेचा शुभारंभ केल्यानंतर आप नेत्यांनी सांगितले. (AAP Election Campaign)

केजरीवाल नसतील तर कुटुंबाच्या सुखाची काळजी कोण घेणार?

या अभियानाअंतर्गत आम्ही घराघरात जाऊन समजावून सांगू, या संपूर्ण संघर्षाचे मतांमध्ये रूपांतर करू, असे आपचे महासचिव संदीप पाठक यांनी सांगितले. अरविंद केजरीवाल यांना लोकसभा निवडणुकीतून हटवण्याचा कट रचून त्यांना तुरुंगात टाकण्यात आले आहे. केजरीवाल यांनी आपले संपूर्ण आयुष्य देशातील जनतेसाठी संघर्ष करण्यात घालवले आहे. सरकार स्थापन झाल्यापासून त्यांनी दिल्लीतील प्रत्येक कुटुंबाच्या सुखासाठी काम केले आहे. मुलांचे शिक्षण, चांगले उपचार, पाणी, मोफत वीज अशी व्यवस्था केली. महिलांसाठी मोफत बस प्रवासाची व्यवस्था करण्यात आली होती. महिलांना दरमहा एक हजार रुपये मिळावेत असा ठराव विधानसभेने मंजूर केला आहे. केजरीवाल यांनी आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडले आहे. आता जबाबदारी दिल्लीच्या जनतेची आहे. दिल्लीने ज्या प्रामाणिक राजकारणाला जन्म दिला, त्यांना अडचणीत आणण्याचा डाव आखला आहे. त्यामुळे त्यांचे संरक्षण करण्याची जबाबदारी दिल्लीची आहे. केजरीवाल नसतील तर तुमच्या कुटुंबाच्या सुखाची काळजी कोण घेणार? आज संपूर्ण जग आपल्याकडे पाहत आहे, असेही पाठक म्हणाले. (AAP Election Campaign)

हेही वाचा :

Back to top button