Nashik Godam Fire | गौळाणे येथील भंगार गोदामाला आग : लाखो रुपयांचे नुकसान | पुढारी

Nashik Godam Fire | गौळाणे येथील भंगार गोदामाला आग : लाखो रुपयांचे नुकसान

सिडको : पुढारी वृत्तसेवा – गौळाणे येथील एका भंगार गोदामाला गुरुवारी (दि.२३) रात्री एक वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले असून घटनेची माहिती मिळताच अग्निशमनच्या पाच बंबाच्या सहायाने एक तासाच्या अथक प्रयत्नाने आग विझवण्यात आली. सुदैवाने यात कुठलीही जीवित हानी झालेली नाही. मात्र या आगीत 25 लाख रुपयाचे स्क्रॅप जळून खाक झाले आहे.

गोळाणे येथील कलाउद्दीन खान यांच्या मालकीचे झेड इंटरप्राईजेस नावाने स्क्रॅपचे गोडाऊन आहे. या गोडाऊनला गुरुवारी (दि.२३) रात्री एक वाजून वीस मिनिटांच्या सुमारास मोठी आग लागली. आगीने रौद्र रूप धारण केल्याने आगीचे लोळ हवेत पसरले होते. या ठिकाणी आग लागल्याचे समजताच भंगार गोदामाचे मालक कलाउद्दीन खान यांनी सिडको फायर स्टेशनला कॉल केला. सिडको केंद्राचे अग्निशमन दलाचे जवान यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. आगीचे गांभीर्य लक्षात घेता पुन्हा तीन बंब पचारण करण्यात आले. सिडको विभाग अग्निशामक दलाचे कर्मचारी प्रमोद लहामगे, एम.पी आहिरे, ए.ए.पटेल, एस.डी. देशमुखसह मुख्यालय, अंबड एम .आय.डि.सी. सातपूर या चार केंद्रावरील पाच बंबाचे अग्निशामक दलाचे कर्मचारी सर्वांनी एकत्रित आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. या आगीत भंगार गोडाऊनचे अंदाजे 25 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र आगीचे अद्यापही कारण समोर आलेले नसून पोलीस पुढील तपास घेत आहे.

हेही वाचा:

Back to top button