हार्दिक पांड्या-नताशा स्टॅनकोविक विभक्त होताहेत? इन्स्टावरून हटवले आडनाव | पुढारी

हार्दिक पांड्या-नताशा स्टॅनकोविक विभक्त होताहेत? इन्स्टावरून हटवले आडनाव

पुढारी ऑनलाईन डेस्क : क्रिकेटर हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी सर्बियन अभिनेत्री नताशा स्टॅनकोविक हे वेगळे झाले असावेत, अशी चर्चा सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. कारण नताशाने आपल्या नावापुढील आडनाव हटवले असून सोशल मीडियावर एकमेकांबद्दलचे पोस्ट करण्याचे त्यांनी थांबवले असल्याचे म्हटले आहे.

हेही वाचा- 

या कपलने मे २०२० मध्ये लग्न केले होते. त्यांनी त्याच वर्षी जुलैमध्ये त्यांच्या पहिल्या मुलाचे – अगस्त्यचे स्वागत केले. मात्र, आता हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविचच्या संसारात अडचणी निर्माण झाल्याचे म्हटले जात आहे. त्यांच्या विभक्त होण्याची कोणतीही पुष्टी नसली तरी, काही चाहत्यांनी लक्ष वेधले आहे की प्रिय जोडप्याने त्यांच्या सोशल मीडिया खात्यांवर एकमेकांबद्दल पोस्ट करणे थांबवले आहे. नताशाचे पूर्वी तिच्या इन्स्टाग्राम बायोमध्ये पांड्या हे आडनाव होते, तिने ते काढून टाकले आहे. हार्दिक पांड्याने ४ मार्च रोजी पत्नीच्या वाढदिवसानिमित्त काहीही पोस्ट करणे टाळले होते.

हेही वाचा-

नताशाने आपल्या इन्स्टाग्राम वरून पांड्या हे आडनाव हटवले आहे. शिवाय हार्दिक पांड्या सोबत असलेले सर्व फोटोज डिलीट केले आहेत. केवळ तेच फोटो ठेवले आहेत, ज्यामध्ये त्यांचा मुलगा आहे. हार्दिकने पत्नी नताशाच्या वाढदिवसाला देखील कोणतीही पोस्ट केलेली दिसत नाही.

हेही वाचा-

Back to top button