RBI at 90 | देशाचा GDP मजबूत, महागाई नियंत्रणात : RBI गर्व्हनर शक्तिकांत दास | पुढारी

RBI at 90 | देशाचा GDP मजबूत, महागाई नियंत्रणात : RBI गर्व्हनर शक्तिकांत दास

पुढारी ऑनलाईन : भारतीय रिझर्व्ह बँकेला आज ९० वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात आरबीआयचे गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी संबोधित केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अर्थमंत्री निर्मला सीतारामन उपस्थित होते. ”आज आपली जीडीपी वाढ मजबूत आहे. महागाई मध्यम पातळीवर आहे. आर्थिक क्षेत्र स्थिर आहे. बाह्य क्षेत्र लवचिक आहे आणि परकीय चलनसाठा सर्वकालीन उच्च पातळीवर आहे.” असे शक्तिकांत दास यांनी यावेळी सांगितले. (RBI at 90)

“कोविड-१९ महामारी आणि सध्या सुरू असलेल्या भू-राजकीय संघर्षामुळे भारतासह जगातील प्रत्येक अर्थव्यवस्थेच्या लवचिकतेची चाचणी घेतली आहे. पण आपल्या देशाने स्वीकारलेल्या समन्वित मौद्रिक आणि वित्तीय धोरणांनी आपल्या अर्थव्यवस्थेला या धक्क्यांपासून वाचवण्यास मदत केली. आम्हाला पूर्वीपेक्षा अधिक मजबूत बनवण्यास मदत केली.” असेही ते म्हणाले. (RBI at 90)

भारतीय रिझर्व्ह बँकेने गेल्या दहा वर्षांत भारताच्या बँकिंग प्रणाली आणि अर्थव्यवस्थेच्या परिवर्तनात कौतुकास पात्र भूमिका बजावली आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी सोमवारी मुंबईत आरबीआयच्या ९० व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलताना सांगितले.

“जेव्हा मी २०१४ मध्ये आरबीआयच्या ५० व्या वर्धापनदिनाला उपस्थित होतो, तेव्हा परिस्थिती पूर्णपणे वेगळी होती,” असे सांगत पीएम मोदींनी भारताच्या दुहेरी ताळेबंद संकट, बँकिंग गोंधळाकडे लक्ष वेधले.

भारताचे बँकिंग क्षेत्र आव्हाने आणि समस्यांनी त्रस्त होते. मग ते एनपीए असो, व्यवस्थेची स्थिरता आणि तिचे भविष्य असो, प्रत्येक क्षेत्र शंकांनी भरलेले होते. पण आज परिस्थिती चांगली झाली असल्याचे त्यांनी नमूद केले.

“जी बँकिंग व्यवस्था मोडकळीस येण्याच्या मार्गावर होती, ती आज नफा पाहात आहे आणि क्रेडिट देण्याच्या बाबतीत विक्रम प्रस्थापित करत आहे. केवळ १० वर्षांत असा बदल घडवणे सोपे नव्हते. यामागे आमची धोरणे, हेतू आणि निर्णय स्पष्ट होते.,” असे पीएम मोदी म्हणाले. (RBI at 90)

हे ही वाचा :

 

Back to top button