Virat Kohli | विराट धोनीला भेटला! RCB vs CSK सामन्यापूर्वी म्हणाला… | पुढारी

Virat Kohli | विराट धोनीला भेटला! RCB vs CSK सामन्यापूर्वी म्हणाला...

पुढारी ऑनलाईन डेस्क : जगातील सर्वात लोकप्रिय टी-20 लीग आयपीएलता 17 वा हंगाम सुरू होण्यास अवघे काही तास बाकी आहेत. यंदाच्या हंगामातील पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि चेन्नई सुपर किंग्स (CSK) यांच्यात होणार आहे. आयपीएलच्या सुरूवातीपासून धोनी आणि कोहली लीगमध्ये खेळत आहेत. एकीकडे चाहते दोन दिग्गज खेळाडूंमधील प्रतिस्पर्ध्याची आतुरतेने वाट पाहत असताना, दुसरीकडे चेन्नईतील सामन्यापूर्वी कोहलीने धोनीची सरावादरम्यान भेट घेतली. यावेळी कोहली म्हणाला की, धोनीला भेटून मला नेहमीच छान वाटतं. (Virat Kohli)

आरसीबी फ्रँचायझीच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये कोहली म्हणाला की, धोनीला भेटून खूप दिवस झालेत. पुढे तो म्हणाला की, सीएसकेच्या चाहत्यांनी भरलेल्या मैदानावर खेळताना मला चांगले वाटते. विशेषत: सीएसकेच्या होम ग्राउंड चेपॉक स्टेडियमवर. चेन्नई आणि बंगळुरूच्या सामन्यादरम्यान मैदानावरील वातावरण पूर्णपणे वेगळे असते.

आयपीएलचा धुमधडाका आजपासून

जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलच्या सतराव्या पर्वाला आजपासून प्रारंभ होत आहे. चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर गतविजेता चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूर या दोन संघांमध्ये सलामीची लढत होणार आहे. यंदा या स्पर्धेत बरेच बदल पाहायला मिळत असून लीगचे दोन मोठ्या फ्रँचायझी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांनी आपले कर्णधार बदलले आहेत. मुंबई इंडियन्सने रोहित शर्माच्या जागी हार्दिक पंड्या तर सीएसकेने महेंद्रसिंग धोनीच्या जागी ऋतुराज गायकवाडकडे नेतृत्व दिले आहे. याशिवाय काही नियमांमध्येही बदल करण्यात आले आहेत. स्पर्धेेचा प्रारंभ बॉलीवूड स्टार्सच्या अदाकारीने होणार आहे. (Virat Kohli)

2008 मध्ये सुरू झालेल्या या स्पर्धेचे हे सतरावे वर्ष आहे. या काळात स्पर्धेचा यशाचा आलेख नेहमीच चढता राहिला आहे. सुरुवातीच्या काळात 8 संघ होते; परंतु आता या स्पर्धेत दहा संघ सहभागी होत आहेत. या संघांमध्ये दोन महिन्यांच्या काळात जवळपास 55 ते 60 सामने होतात. (Virat Kohli)

देशात होत असलेल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या स्पर्धेचे वेळापत्रक दोन टप्प्यात जाहीर होणार आहे. स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यातील वेळापत्रक जाहीर झाले असून यात 7 एप्रिलपर्यंत एकूण 21 सामने होणार आहेत. दुसर्‍या टप्प्याचे वेळापत्रक लवकरच जाहीर होणार आहे. 2009 आणि 2014 या साली देशात लोकसभेच्या निवडणुकीमुळे स्पर्धा देशाबाहेर खेळवण्यात आली होती; परंतु 2019 आणि यंदा ही स्पर्धा देशातच होत आहे.

हेही वाचा :

Back to top button