Maharashtra Congress: महाराष्ट्रात काँग्रेसला आणखी एक धक्का, कोडवते पती-पत्नींचा भाजपमध्ये प्रवेश | पुढारी

Maharashtra Congress: महाराष्ट्रात काँग्रेसला आणखी एक धक्का, कोडवते पती-पत्नींचा भाजपमध्ये प्रवेश

पुढारी ऑनलाईन डेस्क: लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेला एकामागे एक धक्के बसत आहेत. तर दुसऱ्या बाजूला भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू आहे. महाराष्ट्रात काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. त्यानंतर आज (दि.२२) महाराष्ट्र काँग्रेसचे माजी नेते डॉ. नितीन कोडवते आणि त्यांच्या पत्नी चंदा कोडवते यांनी महाराष्ट्र भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. लोकसभा पार्श्वभूमीवर काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जात आहे. (Maharashtra Congress)

भाजप प्रदेशअध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत कोडवते पती-पत्नीने दोघांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. डॉ.नितीन कोडवते हे महाराष्ट्रातील गडचिरोली येथील महत्त्वाचे नेते होते. नितीन कोडवते हे नक्षलग्रस्त गडचिरोलीतील प्रसिद्ध नाव आहे. 2019 ची विधानसभा निवडणूक त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर लढवली होती. (Maharashtra Congress)

हेही वाचा:

 

Back to top button