दुर्दैवी ! नाशिकच्या खामखेडा येथे शेततळ्यात बुडून दोघा सख्ख्या भावांचा मृत्यू, गाव हळहळलं | पुढारी

दुर्दैवी ! नाशिकच्या खामखेडा येथे शेततळ्यात बुडून दोघा सख्ख्या भावांचा मृत्यू, गाव हळहळलं

देवळा (जि. नाशिक) ; खामखेडा येथील बुटेश्वर शिवारातील गणेश संतोष आहेर यांचे दोन्ही मुलं दुपारच्या सुमारास कांदा काढणी सुरू असताना शेतात आलेल्या वानरांना हाकलून लावण्यासाठी पाठीमागे गेल्यानंतर डोंगराला लागून असलेल्या शेततळ्यात पाणी पाहण्यासाठी गेलेल्या दोघा सख्या भावांचा पाय घसरून पडल्याने शेततळ्यात बुडून मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने गाव व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, खामखेडा गावातील बुटेश्वर शिवारातील गणेश संतोष आहेर हे आपल्या डोंगराला लागून असलेल्या शेतात राहतात. त्यांची दोन्ही मुलं तेजस आहेर (१२) व मानव आहेर (६) हे आज सकाळची शाळा करून घरी गेले असता. दुपारी तीन वाजता शेतात उन्हाळ कांदा काढणी सुरू असल्याने आई वडिलांना मदतीसाठी शेतात होते. दुपारच्या वेळेस जंगलातून शेतात आलेल्या वांनराना हुसकवुन लावण्यासाठी त्यांच्या पाठीमागे गेले होते .

वानरे हुसकून आल्यानंतर जंगलाला लागून असलेल्या सदाशिव शेवाळे यांच्या शेततळ्यात पाणी पाहायला गेले असता मोठा भाऊ तेजस याचा पाय घसरल्याने तो शेततळ्यात पडला. त्याला वाचवण्यासाठी मानव यांनी हात दिला. मात्र तोही शेततळ्यात घसरला. त्यांच्या सोबत असलेल्या चार वर्षीय बहिनेने शेतात पळत येत काकांना हि घटना सांगितली. शेतात कांदे काढणी करत असलेले केदा आहेर व इतरांनी शेततळ्याकडे धाव घेतली. मात्र शेततळे अर्धे भरले असल्याने तोपर्यंत दोघांचाही बुडून मृत्यू झाला होता. शेजारील शेतकरी हरेश शेवाळे यांनी शेततळ्यातून दोघा मुलांना बाहेर काढले. मात्र दोघांचाही बुडून मृत्यु झाला. त्यांना देवळा येथील ग्रामीण रुग्णालयात छवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

तेजस आहेर हा खामखेडा येथील जनता विध्यालयात इयत्ता सहावीत तर व मानव आहेर हा जिल्हा परिषद शाळा थळवस्ती येथे इयत्ता दुसरीत होता. गणेश आहेर यांच्या दोन्ही मुलांच्या अशा दुर्दैवी घटनेने मृत्यू झाल्याने गाव व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

हेही वाचा –

Back to top button