Hingoli : खैरी घुमट कानिफनाथ गडावर रंगला शिखरी काठ्याचा नेत्रदीपक रिंगण सोहळा | पुढारी

Hingoli : खैरी घुमट कानिफनाथ गडावर रंगला शिखरी काठ्याचा नेत्रदीपक रिंगण सोहळा

हिंगोली पुढारी वृत्तसेवा : हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील खैरी घुमट येथील कनिफनाथ गडावर आज (दि. १९) पासून यात्रेला सुरुवात झाली आहे.  मराठवाड्यासह विदर्भातील भाविक मोठ्या प्रमाणात आज दर्शनासाठी येतात. (Hingoli)

Hingoli : शेकडो वर्षांपासून  परंपरा

सेनगाव तालुक्यातील खैरी घुमट येथील कनिफनाथ गडावर आज (दि. १९) शिखरी काठ्याचा नेत्रदीपक रिंगण सोहळा मोठ्या उत्साहात फार पडला. नांदेड जिल्ह्यातील डॊरली येथील कावडीचे आगमन झाल्यावर या यात्रेला सुरुवात होते.  तसेच खडकी येथील अबदागिरी व बोरखेडी पिनगाळे, हत्ता नाईक येथील देवाचे बाण यांच्या भेटी होतात. शेकडो वर्षांपासून ही परंपरा अखंडपणे सुरू आहे. ही यात्रा दिवसभऱ भरते. आज शिखरी काठ्याची मिरवणूक पार पडली. दुपारी चार कानिफनाथ महाराजांच्या पालखीची मिरवणूक निघाली. त्या पालखीच्या पाठीमागें वेगवेगळ्या गावातील मानाच्या शिखरी काठ्या व भगवे ध्वज हातात घेऊन भाविकांनी मंदिराला प्रदक्षिणा घातल्यानंतर मंदिरात शिखरी काठ्या हातावर घेऊन नृत्य केले जाते. हा नेत्रदीपक रिंगण सोहळा पाहण्यासाठी विदर्भातील व मराठवाड्यातील हजारो भाविक यात्रेच्या निमित्ताने खैरी घुमट येथे येतात.

खैरी घुमट येथील मंदिर हे प्राचीन मंदिर असून, हे मंदिर किल्लासदृश वास्तू असल्याने भाविकांमध्ये आकर्षण आहे. या किल्ल्यात हेमाडपंती पध्दतीचे कानिफनाथचे मंदिर आहे. येलदरी धरणाच्या जलाशयाच्या काठावर हे मंदिर असल्याने त्याच्या वैभवात अधिकच भर पडली आहे. यात्रेच्या निमित्ताने मंदिर समिती कडून दोन दिवस शंकर पटाचे आयोज करण्यात आले आहे. त्याचबरोबर पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता.

हेही वाचा

Back to top button