IPL 2024 : आयपीएलमध्ये ‘हे’ आहेत तरुण तुर्क, म्हातारे अर्क! जाणून घ्या खेळाडूंचे वय | पुढारी

IPL 2024 : आयपीएलमध्ये ‘हे’ आहेत तरुण तुर्क, म्हातारे अर्क! जाणून घ्या खेळाडूंचे वय

पुढारी ऑनलाईन डेस्क : IPL 2024 : आयपीएलचा 17 वा हंगाम 22 मार्चपासून सुरू होत आहे. टी-20 फॉरमॅटमध्ये खेळवल्या जाणा-या लिगमध्ये काही संघांनी युवा खेळाडूंवर अधिक विश्वास दाखवला आहे. तर काही संघांनी अनुभवी आणि वयस्कर खेळाडूंना प्राधान्य दिले आहे. आयपीएलमधील या तरुण तुर्क, म्हातारे अर्क असणा-या खेळाडूंवर एक नजर…

अंगकृष्ण रघुवंशी (वय : 18 वर्षे 287 दिवस)

आयपीएल 2024 मधील सर्वात तरुण खेळाडू म्हणजे अंगकृष्ण रघुवंशी (Angkrish Raghuvanshi). त्याला कोलकाता नाईट रायडर्सने (केकेआर) 20 लाख रुपयांना करारबद्ध केले आहे. या खेळाडूने आतापर्यंत 7 टी-20 सामने खेळले असून 115.96 च्या स्ट्राइक रेटने 138 धावा केल्या आहेत. 2022 अंडर-19 विश्वचषकात अंगकृष्णने 6 सामने खेळले आणि 46.33 च्या सरासरीने 278 धावा केल्या. तो टीम इंडियासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. (IPL 2024)

3 young KKR batters to watch out for in IPL 2024 ft. Angkrish Raghuvanshi

अरावेल्ली अवनीश (वय : 18 वर्षे 290 दिवस)

आयपीएल 2024 साठी झालेल्या लिलावात अरावेली अवनीशला (Aravelly Avanish) चेन्नई सुपर किंग्स (CSK) ने 20 लाख रुपयांना विकत घेतले. तो मूळचा हैदराबादचा असून यष्टिरक्षक फलंदाज आहे. या खेळाडूने अद्याप एकही टी-20 सामना खेळलेला नाही. अवनीश अंडर-19 एकदिवसीय क्रिकेटमध्ये 14 सामने खेळला आहे. ज्यातील 12 डावांमध्ये 21.87 च्या सरासरीने 175 धावा करण्यात यशस्वी झाला आहे. त्याची सर्वोत्तम धावसंख्या 60 धावा आहे.

Aravelly Avanish Rao IPL 2024 Team, Price, Salary, Career Stats

स्वस्तिक चिकारा (वय 18 वर्षे 350 दिवस)

देशांतर्गत क्रिकेटमध्ये उत्तर प्रदेशकडून खेळणाऱ्या स्वस्तिक चिकाराला (Swastik Chikara) दिल्ली कॅपिटल्सने (डीसी) 20 लाख रुपयांमध्ये आपल्या संघात सामील केले. आतापर्यंत त्याने एकही टी-20 क्रिकेट सामना खेळलेला नाही. या खेळाडूला लिस्ट-ए क्रिकेटमध्ये 6 सामन्यांमध्ये संधी मिळाली आहे. या दरम्यान त्याने 33.33 च्या सरासरीने 200 धावा काढल्या आहेत. त्याच्या बॅटमधून 1 शतक झळकले आहे. त्याची सर्वोत्तम धावसंख्या 117 धावा आहे. (IPL 2024)

Rinku Singh से भी खतरनाक बल्लेबाज की IPL 2024 में एंट्री! एक पारी में जड़ दिए 585 रन, सहवाग का है भक्त | IPL 2024 Delhi Capitals Swastik Chikara Played A Superb

अर्शीन कुलकर्णी (वय 19 वर्षे 32 दिवस)

अर्शीन कुलकर्णी (Arshin Kulkarni) लखनौ सुपर जायंट्स (एलएसजी) संघाचा भाग असेल. आयपीएल 2024 साठी दुबई येथे झालेल्या लिलावात त्याला फ्रँचायझीने 20 लाख रुपयांना करारबद्ध केले. या खेळाडूने टी-20 क्रिकेटमध्ये आतापर्यंत फक्त 6 सामने खेळले असून 5 डावात त्याने 163.51 च्या स्ट्राईक रेटने 121 धावा केल्या आहेत. तसेच गोलंदाजीतही अर्शीन कौशल्य दाखवून 6 सामन्यात 4 बळी घेतले आहेत.

Meet Arshin Kulkarni - The next Hardik Pandya In The Making

नूर अहमद (19 वर्षे 75 दिवस)

अफगाणिस्तानचा फिरकी गोलंदाज नूर अहमद (Noor Ahmad) आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सकडून (जीटी) खेळत आहे. त्याने 2023 मध्ये पदार्पण केले. त्याने आतापर्यंत 13 सामने खेळले आहेत. या कालावधीत त्याने 23.06 च्या सरासरीने 16 विकेट्स घेतल्या आहेत. त्याचा इकॉनॉमी रेट 7.82 आहे. 37 धावांत 3 बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. या खेळाडूने टी-20 क्रिकेटमध्ये 83 सामने खेळले असून 25.06 च्या सरासरीने 88 बळी घेतले आहेत.

Why was Afghanistan spinner Noor Ahmad banned from ILT20? | Sporting News India

महेंद्रसिंग धोनी (वय : 42 वर्ष 255 दिवस)

चेन्नई सुपर किंग्सचा (सीएसके) कर्णधार महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) आयपीएल 2024 मधील सर्वात वयस्कर खेळाडू आहे. तो 2008 पासून आयपीएल खेळत आहे. भारतीय क्रिकेट संघातून निवृत्ती घेतल्यानंतरही तो आयपीएल खेळत राहिला. त्याने आतापर्यंत 250 सामने खेळले असून 38.79 च्या सरासरीने 4,082 धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राइक रेट 135.92 आहे. त्याचा हा शेवटचा हंगाम असेल, असे मानले जात आहे. (IPL 2024)

ms dhoni birthday: On MS Dhoni birthday, CSK investors worry over his retirement, IPL fate - The Economic Times

फाफ डू प्लेसिस (वय : 39 वर्षे 249 दिवस)

फाफ डू प्लेसिस (Faf du Plessis) आयपीएलमधील सर्वात जुना खेळाडू आहे. तो सध्या आरसीबीचा कर्णधार आहे. पुढील वर्षी आयपीएलचा मेगा लिलाव होणार आहे. अशा स्थितीत डु प्लेसिसचा हा शेवटचा हंगाम असेल, असा अंदाज आहे. डू प्लेसिसने 130 आयपीएल सामन्यांत 36.90 च्या सरासरीने आणि 134.14 च्या स्ट्राइक रेटने 4,133 धावा केल्या आहेत. या कालावधीत या खेळाडूने 33 अर्धशतके झळकावली आहेत. (IPL 2024)

CSKCL unveils name of Johannesburg-based franchise in CSA T20 League, Faf du Plessis appointed captain

ऋद्धिमान साहा (वय : वय 39 वर्षे 146 दिवस)

गुजरात टायटन्सच्या (जीटी) वृद्धिमान साहाने (Wriddhiman Saha) आयपीएलमध्ये 161 सामने खेळले आहेत. या कालावधीत त्याने 128.05 च्या स्ट्राइक रेटने 2,798 धावा काढल्या आहेत. त्याने आपल्या बॅटने 1 शतक आणि 15 अर्धशतके झळकावली आहेत.

IPL 2023: Gujarat Titans opener Wriddhiman Saha sticks to his fast-scoring mantra

मोहम्मद नबी (वय : 39 वर्षे 77 दिवस)

मोहम्मद नबी (Mohammad Nabi) हा अफगाणिस्तानचा अष्टपैलू क्रिकेटपटू आहे. त्याने 2017 मध्ये त्याचे आयपीएल पदार्पण केले. त्याने आयपीएल कारकिर्दीत आतापर्यंत 17 सामने खेळले आहेत. फलंदाजी करताना त्याने 15.00 च्या सरासरीने 180 धावा तर गोलंदाजी करताना 13 विकेट घेतल्या आहेत. आयपीएल 2024 च्या मीनी लिलावात मुंबई इंडियन्सने त्याला 1.50 कोटी रुपयांना विकत घेतले. यापूर्वी तो एसआरएच, केकेआर संघांकडून खेळला आहे. (IPL 2024)

Strongest XI of MI | MI XI in IPL 2024

दिनेश कार्तिक (वय : 38 वर्षे 291 दिवस)

आरसीबीचा यष्टिरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकचा (Dinesh Karthik) हा शेवटचा आयपीएल हंगाम आहे. त्याने याबाबत यापूर्वीच खुलासा केला आहे. कार्तिकने आतापर्यंत 242 सामने खेळले असून सर्वाधिक सामने खेळण्याच्या बाबतीत तो तिसऱ्या क्रमांकावर आहे. या बाबतीत धोनी (250) आणि रोहित शर्मा (243) पहिल्या 2 स्थानावर आहेत. कार्तिकने आयपीएलमध्ये 25.8 च्या सरासरीने आणि 132.71 च्या स्ट्राइक रेटने 4,516 धावा केल्या आहेत. यामध्ये 20 अर्धशतकांचा समावेश आहे. (IPL 2024)

LSG vs RCB IPL 2022 Eliminator: Dinesh Karthik 'indebted' to Royal Challengers Bangalore for THIS reason | Cricket News | Zee News

Back to top button