अकोला: राष्ट्रीय महामार्गावर ट्रकची दुचाकीला धडक; रामटेकचा तरुण ठार | पुढारी

अकोला: राष्ट्रीय महामार्गावर ट्रकची दुचाकीला धडक; रामटेकचा तरुण ठार

अकोला, पुढारी वृत्तसेवा: राष्ट्रीय महामार्गावर दुचाकीने आपल्या गावाकडे जात असता ट्रकने दिलेल्या धडकेत रामटेक येथील युवक जागीच ठार झाला. ही घटना बुधवारी (दि. १३) रात्री घडली. याप्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राजकुमार देविदास कोकाटे (वय ४०, रा. रामटेक) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्याचा भाऊ उमेश हा आपल्या मोटारसायकल (एमएच ३० एवाय ०९४२) वरून मूर्तिजापूर येथे हरभरा विक्री करुन बुधवारी रात्री ९.३० च्यादरम्यान रामटेककडे जात होता. दरम्यान, हेंडजजवळील पेट्रोल पंपासमोर ट्रकने (युपी ६३ एटी ४३५९) दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकी चालक जागीच ठार झाला.

तर बेजबाबदारपणे अपघातास कारणीभूत ठरलेला ट्रक चालक घटनास्थळावरुन पळून जात असता, मूर्तिजापूर शहर व ग्रामीण पोलिसांनी पाठलाग करीत ट्रक काटेपूर्णा येथील टोल नाक्याजवळ पकडला. या धडकेत दुचाकीस्वार चालक उमेश कोकाटे हे जागीच ठार झाल्याच्या फिर्यादीवरून ट्रक चालक एमुल हसन नजमुल हसन (रा. पवारपूर, जि. प्रतापगड, उत्तर प्रदेश) याच्यविरुद्ध ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Back to top button