अकोला : ट्रकच्या धडकेत देवदर्शनाला निघालेली वृद्ध महिला ठार

प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on
Updated on

अकोला; पुढारी वृत्तसेवा : अकोट बसमधून उतरून मंदिरात दर्शनाला जाणाऱ्या वृद्ध महिलेला गौण खनिज घेऊन जाणाऱ्या भरधाव ट्रकने उडवले. या अपघातात वृद्ध महिला जागेवरच ठार झाली. हा अपघात अकोट हिवरखेड मार्गावर असलेल्या उमरा फाट्याजवळ बुधवारी (दि.१३) सकाळी घडला. अंजना समाधान गव्हाळे (वय ६५) असे मृत वृद्ध महिलेचे नाव आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप समाधान धुंदे (रा. शिरसोली) यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, माझी सासू अंजना समाधान गव्हाळे या आणि मी बसने अकोटकडे येत असताना वडाळी सटवाईजवळ असलेल्या गजानन महाराज मंदिरात जाण्याकरिता बसमधून उतरलो. फुले घेण्यासाठी रस्त्याच्या बाजूला उभे असताना गौण खनिजने भरलेला ट्रक (एनएच ३० बीडी २४३५) ने माझी सासू अंजनाबाई यांना धडक दिली. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी अकोट ग्रामीण पोलिसांनी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news