मेंदू कुरतडणार्‍या अमिबाने केरळमधील मुलीचा मृत्यू | पुढारी

मेंदू कुरतडणार्‍या अमिबाने केरळमधील मुलीचा मृत्यू

तिरुअनंतपूरम : मेंदू कुरतडणार्‍या अमिबामुळे केरळात मलप्पूरम जिल्ह्यातील मुन्नीयूर येथील एका 5 वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. दूषित पाण्यातून नाकावाटे हा अमिबा मुलीच्या शरीरात गेला. एक मे रोजी तिने तलावात अंघोळ केली होती. दहा मे रोजी तिला डोकेदुखी आणि उलट्यांचा त्रास सुरू झाला. नंतर कोझिकोडे येथील शासकीय रुग्णालयात तिला दाखल करण्यात आले होते. आठवडाभर तिच्यावर उपचार चालले, पण उपयोग झाला नाही.

Back to top button