Kuldeep Yadav : कुलदीपने घेतली इंग्लंडची ‘फिरकी’; निम्मा संघ धाडला तंबूत | पुढारी

Kuldeep Yadav : कुलदीपने घेतली इंग्लंडची 'फिरकी'; निम्मा संघ धाडला तंबूत

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा कसोटी सामना आजपासून धर्मशाळा येथे होत आहे. सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने डावाची सुरूवात आक्रमक पद्धतीने केली. त्यांच्या सलामीवीरांनी 17 ओव्हरमध्ये 64 धावांची खेळी केली. याला खिंडार पाडण्यासाठी भारताचा कर्णधार रोहितने फिरकीपटू कुलदीपला गोलंदाजीसाठी बोलावले. यानंतर आपल्या फिरकीच्या सहाय्याने कुलदीप इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत धाडला. (Kuldeep Yadav)

सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडच्या डावाची सुरूवात चांगली झाली. त्यांच्या सलामीच्या फलंदाजांनी भारताच्या वेगवान गोलंदाजांकडून 17 ओव्हरमध्ये 64 धावा केल्या. इंग्लंडची धावगती कमी करण्यासाठी रोहितने बॉल संघातील फिरकीपटू अश्विन आणि कुलदीप यांच्याकडे सोपावला. 18 ओव्हर टाकण्य़ासाठी आलेल्या कुलदीपने डकेटला शुभमनकरवी झेलबाद केले. यावेळी शुभमनने डकेटचा अप्रतिम झेल टिपला. त्याच्यासह कुलदीपने जॅक क्रॉली (79), बेन डकेट (27), ऑली पोप (11) आणि जॉनी बेअरस्टो (29) यांना आपल्‍या फिरकीच्‍या जाळ्यात अडकवले. १७५ धावांवर इंग्‍लंडचा निम्‍मा संघ तंबूत परतला.  (Kuldeep Yadav)

सामन्याचे अपडेट्स :

कुलदीपने घेतली इंग्लंडची ‘फिरकी’; निम्मा संघ तंबूत धाडला

सामन्याच्या 46 व्या षटकात बेन स्टोक्सच्या रूपात इंग्लंडला सहावा धक्का बसला. त्याला भारताचा फिरकीपटू कुलदीप यादवने एलबीब्ल्यू केले. स्टोक्सने 6 बॉल खेळले. यामध्ये त्याला खातेही उघडता आले नाही.

जडेजाने रुटला तंबूत धाडले, १७५ धावांवर इंग्‍लंडचा निम्‍मा संघ तंबूत

४५ व्‍या षटकात रवींद्र जडेजा याने २६ धावांवर खेळार्‍या रुटला त्‍याने पायचीत केले. १७५ धावांवर इंग्‍लंडला पाचवा धक्‍का बसला.

कुलदीपच्‍या विकेटचा ‘चाैकार’! 175 धावांवर इंग्‍लंडला चाैथा धक्का

कुलदीपने ४४ व्‍या षटकात २९ धावांवर खेळणार्‍या बेअरस्‍टोला यष्‍टीरक्षक ध्रुवकरवी झेलबाद केले. कुलदीपने सलग चार विकेट घेतल्‍या आहेत.

इंग्लंडला मोठा धक्का; झॅक क्रॉली 79 धावाकरून माघारी

सामन्याच्या 38 व्या ओव्हरमध्ये झॅक क्रॉलीच्या रूपात मोठा धक्का बसला. झॅकला भारताचा फिरकीपटू कुलदीपने क्लीन बोल्ड केले. झॅकने आपल्या खेळीत 108 बॉलमध्ये 79 धावांची खेळी केली. यामध्ये त्याने 11 चौकार आणि 1 षटकार लगावला.

लंचपर्यत इंग्लंड 2 बाद 100; झॅक क्रोलीचे अर्धशतक

इंग्लंड आणि भारत यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अंतिम सामना धर्मशाला येथे खेळवण्यात येत आहे. सामन्यात लंचपर्यंत फलंदाजी करताना इंग्लंडने 2 विकेट गमावून 100 धावा केल्या आहेत. बेन डकेट आणि जॅक क्रोली यांनी पहिल्या विकेटसाठी 64 धावांची भागीदारी केली. कुलदीपने ही भागीदारी फोडत इंग्लंडला पहिला धक्का दिला. त्याने डकेटला 27 धावांवर शुभमन गिलकरवी झेलबाद केले. यानंतर क्रॉलीने कसोटी कारकिर्दीतील 14वे अर्धशतक आणि भारताविरुद्ध पाचवे अर्धशतक झळकावले. यानंतर कुलदीपने ओली पोपला यष्टिरक्षक ध्रुव जुरेलकरवी यष्टिचित करून इंग्लिश संघाला आणखी एक धक्का दिला. पोपने 11 धावा केल्या. सध्या क्राऊली ६१ धावांवर नाबाद आहे.

इंग्लंडला दुसरा धक्का; ओली पोप बाद

सामन्याच्या 26 व्या ओव्हरमध्ये इंग्लंडला दुसरा धक्का बसला. भारताचा फिरकीपटू कुलदीप यादवने ध्रुव जुरेलकरवी ओली पोपला बाद केले. ओलीने आपल्या खेळीत 24 बॉलमध्ये 11 धावांची खेळी केली.

जॅक क्रॉलीचे अर्धशतक

जॅक क्रॉलीने 64 चेंडूत कसोटी कारकिर्दीतील 14 वे अर्धशतक झळकावले. भारताविरुद्ध कसोटीतील हे त्याचे पाचवे अर्धशतक आहे. इंग्लंडने एका विकेटच्या गमावून 39 धावा केल्या आहेत. सध्या जॅक क्रोली 52 धावांवर आणि ओली पोप 10 धावांवर फलंदाजी करत आहे.

इंग्‍लंडला ६४ धावांवर पहिला धक्‍का

इंग्लंडला पहिला धक्का 64 धावांवर बसला. कुलदीप यादवच्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात डकेटचा शुभमन गिलने अप्रतिम झेल घेतला.

हेही वाचा :

Back to top button