Lok Sabha Election 2024 : वेध लोकसभेचे; मराठवाड्यात ‘बैलजोडी’चा वरचष्मा
Lok Sabha Election 2024 : जनसंघाचा दिवा घरोघरी लावा
1951 ला स्थापन झालेल्या जनसंघात रा. स्व. संघाच्या विचारांची मंडळी होती. पण कार्यकर्ते आणि नेते यांची वाणवा. दिवा हे चिन्ह असणार्या जनसंघाने ‘जनसंघाचा दिवा घरोघरी लावा’ या घोषणा देत महारा ष्ट्रात प्रथमच बहुतांश जागांवर उमेदवार उभे केले. संभाजीनगरात काँग्रेसचे भाऊराव देशमुख देशमुख हे निवडून आले. त्यांना 135,865 मते पडली तर त्यांचे प्रतिस्पर्धी भाकपचे एस. जी. सरदेसाई यांना 52,401 मतांवर समाधान मानावे लागले. जनसंघाचे बी. गंगाधर यांना 37,883 मते पडली. जनसंघाचा उमेदवार तिसर्या क्रमांकावर राहिला. बीडमध्ये नानासाहेब पाटील निवडून आले, तेथेही जनसंघ तिसर्या क्रमांकावरच होता. जालन्यात विठ्ठलराव जाधव हे विजयी झाले. जनसंघाचे पी. गोपाळराव तिसर्या स्थानी होते. लातूर : तुळशीराम कांबळे,- नांदेड : व्यंकटराव तरोडेकर, धाराशिव : तुळशीराम पाटील, परभणी : शिवाजीराव देशमुख विजयी झाले. परभणीत के. आर. नरसिकर, धाराशिवला टी. एस. पाटील, नांदेडला गंजेवार हे जनसंघाचे उमेदवार पराभूत झाले.
कम्युनिस्ट, आरपीआयचे प्रभूत्व
बीडसारख्या भागात कम्युनिस्टने पाय रोवले होते. जनसंघाप्रमाणेच कशाचीही अपेक्षा न करता असणारे कार्यकर्ते व नेते यामुळे तेथे सातार्याचे क्रांतिसिंह नाना पाटील यांनी बाजी मारली. भाकपला संभाजीनगरात 20.1 टक्के, बीड 45 टक्के, जालना 27.5 टक्के, आरपीआयला लातुरात 35 टक्के, नांदेडला 32 टक्के, धाराशिवला 40 टक्के, परभणीत शेकापला 34.6 असे मतांचे प्रमाण होते.
जॉर्ज फर्नांडिस विजयी, शरद पवारांचा उदय
या निवडणुकीचा महाराष्ट्राच्या दृष्टीने विचार केल्यास काँग्रेसचे मुंबई येथील अनिभिषिक्त सम्राट स. का. पाटील यांना कामगार नेते जॉर्ज फर्नांडिस यांनी पराभूत केले. 67 पर्यंत लोकसभा आणि विधानसभा निवडणुका सोबत होत असत. त्यात काँग्रेसने सहा राज्यातील सरकार गमावले. या निवडणुकीत शरद पवार यांचा राजकीय पटलावर उदय झाला. बारामती विधानसभा मतदारसंघातून ते प्रथमच विजयी झाले.
हेही वाचा
- बिहारमधील राजकारणावर प्रशांत किशोर यांचे मोठे भाकीत; ‘भाजपसह मित्र पक्ष आगामी काळात…’
- Lok Sabha Election 2024 : मतदान करताना भारतीय महिला नवऱ्याचा ‘आदेश’ मानतात का? निवडणुकांचा अभ्यास काय सांगतो?
- Lok Sabha Election 2024 | उत्तरेतील दिग्गजांना शह देत दाक्षिणात्य पी. व्ही. नरसिंह राव कसे बनले होते पंतप्रधान?
- Lok Sabha Election 2024 : वेध लोकसभेचे; लोकसभा निवडणुकांत अनुभवले चढउतार
- Lok Sabha Election 2024 | वेध लोकसभेचे; निझामाविरोधात लढणार्या स्वातंत्र्यसेनानींना संधी