वेगळ्या कचरापेट्या न ठेवल्यास दंड | पुढारी

वेगळ्या कचरापेट्या न ठेवल्यास दंड

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा

पिंपरी-चिंचवड शहरात घराघरातून सक्तीने ओला व सुका कचरा घेण्यात येत असून, त्याबाबत जनजागृती केली जात आहे. त्याचप्रमाणे

घरे, विक्रेते, व्यावसायिक, दुकानदार तसेच, हाउसिंग सोसायट्यांना ओला व सुका कचर्‍यासाठी स्वतंत्र दोन कचरापेट्या (डस्टबिन) न

ठेवल्यास दंड केला जाणार आहे.

ई-पीक पाहणी नोंद करण्याची सोपी पद्धत जाणून घ्या…

केंद्र शासनातर्फे 8 एप्रिल 2016 च्या अधिसूचनेद्वारे महापालिका घनकचरा नियम 2016 ला मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार कचरा निर्माण करणार्‍या संस्थांना त्याच ठिकाणी विलगीकरण करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

ओला, सुका व घरगुती घातक कचरा वेगळा पेटीत जमा करणे आवश्यक आहे. शहरात कोणत्याही प्रकाराचा व्यवसाय करणारे दुकानदार, व्यावसायिक,

रस्त्यांवरील विक्रेते तसेच,निवासी आस्थापना, घरे व हाउसिंग सोसायट्यांना ओला व सुका कचर्यासाठी किमान 2 कचरापेट्या ठेवणे बंधनकारक आहे.

कोरोनाचा नवा व्‍हेरियंट : राज्‍य सरकारचे नवे नियम

दोन कचरापेट्या ठेवण्यासाठी 15 डिसेंबरपर्यंतची मुदत महापालिकेने दिली आहे. त्यानंतर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. एक जानेवारी 2022 पासून कचरा वेगळा न केल्यास त्याचा कचरा उचलण्यात येणार नाही. कचरा वेगळा न केल्यास प्रतिदिन दंड केला जाणार आहे, असे आदेश महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांनी शुक्रवारी (दि.26) काढले आहेत.

राष्ट्रवादीची पदाधिकारी बदलाची रणनिती फायद्याची ?

Back to top button