हॉकी स्टेडियमसाठी ‘ॲस्ट्रो टर्फ’ कोल्हापुरात दाखल; खेळाडूंचा जल्लोष | पुढारी

हॉकी स्टेडियमसाठी 'ॲस्ट्रो टर्फ' कोल्हापुरात दाखल; खेळाडूंचा जल्लोष

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा

मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमवर बसविण्यात येणारे ‘ॲस्ट्रो टर्फ’ शनिवारी कोल्हापुरात दाखल झाले. आपले स्वप्न लवकरच साकार होत सल्याचे दिसताच खेळाडूंनी जल्लोष  केला.

जर्मनीवरून मागविण्यात आलेल्या ‘ॲस्ट्रो टर्फ’ चा पहिला ट्रक कोल्हापुरात येताच त्याचे जंगी स्वागत करण्यात आले. इतकेच नव्हे तर खेळाडूंनी ट्रकवर चढून आनंद व्यक्त केला. दरम्यान, हॉकी स्टेडियम ॲस्ट्रो टर्फ योजना मंजूर करण्यासाठी खासदार संभाजीराजे यांनी केंद्र शासनाकडे विशेष प्रयत्न केल्याबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले.

स्टेडियमच्या विकासाचे काम जलद गतीने सुरू आहे. ॲस्ट्रो टर्फही दाखल झाल्याने तेही काम लवकरच पूर्ण होईल. मात्र तत्पूर्वी कोल्हापूर महानगरपालिकेने स्टेडियमची उर्वरित कामे पूर्ण करणे अत्यावश्यक आहे. मैदाना सभोवतीच्या गॅलरी व दुकान गाळ्यांचे काम तातडीने पूर्ण करून मैदानाच्या देखभाल दुरुस्तीसाठी ची आर्थिक तरतूद करावी, असे आवाहन कोल्हापूर जिल्हा हॉकी संघटनेचे माजी अध्यक्ष व क्रीडा संघटक विजय साळोखे- सरदार यांनी केली आहे.

हेही वाचलं का? 

Back to top button