disha Patani ला रेड बिकिनीत पाहून समुद्राची वाळूही झाली गरम ❤️ | पुढारी

disha Patani ला रेड बिकिनीत पाहून समुद्राची वाळूही झाली गरम ❤️

पुढारी ऑनलाईन डेस्क

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी (disha Patani) सोशल मीडियावर आपल्या बोल्ड लुकमुळे चर्चेत राहते. आताही तिचे सोशल मीडियावर एक फोटो खूप व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये दिशा पटानी समुद्रकिनारी चिल करताना दिसतेय. (disha Patani) रेड बिकिनीत तुला पाहून गरम होतंय❤️❤️ अशी कमेंट एका चाहत्याने तिला दिलीय,

हा फोटो तिने तिच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर शेअर केलेत. फोटोमध्ये ती रेड कलरच्या टायगर प्रिंटेंड बिकिनी घातलेली दिसतेय. या फोटोमध्ये ती समुद्रकिनारी उभारलेली दिसतेय. तिने त्यात सुंदर पोज दिलीय.

तिच्या या फोटोवर चाहते भरभरून कमेंट्स देत आहेत. आतापर्यंत या फोटोला १५ लाखांहून अधिक लोकांनी लाईक्स केले आहे. तिच्या लूकचे भरभरून कौतुकही करत आहेत.

तिने एका मुलाखतीत सांगितलं की- तिचा आगामी चित्रपट एक विलेन रिटर्न्समध्ये ती खूप बोल्ड आणि धाडसी दिसतेय. ती ॲक्शन स्टंटदेखील करते. यासाठी ती ट्रेनिंगदेखील करत आहे.

मोहित सूरीच्या दिग्दर्शनाखाली एक विलेन रिटर्न्स मध्ये ती दिसणार आहे. यामध्ये अभिनेता अर्जुन कपूर, जॉन अब्राहम आणि तारा सुतारिया यांच्याही मुख्य भूमिका आहेत. एकता कपूर निर्मित हा चित्रपट २०११ मध्ये रिलीज झालेला सिद्धार्थ मल्होत्रा-श्रद्धा कपूरच्या चित्रपटाचा सीक्वल आहे.

याशिवाय ती शशांक खेतानचा चित्रपट योद्धामध्ये अभिनेता शाहिद कपूरसोबत ती दिसणार आहे. तसेच दिशा एकता कपूरचा चित्रपट टीनामध्य़ेही दिसणार आहे. प्रभुदेवाच्या दिग्दर्शनाखाली असलेला चित्रपट राधे योर मोस्ट वॉन्टेड भाईमध्ये सलमान खानसोबत दिशा दिसली होती.

Back to top button