BCCI : ‘बीसीसीआय’ करणार क्रिकेटपटूंच्या वेतनात वाढ! | पुढारी

BCCI : ‘बीसीसीआय’ करणार क्रिकेटपटूंच्या वेतनात वाढ!

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : ‘बीसीसीआय’ने कसोटी खेळणार्‍या खेळाडूंच्या वेतनात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘आयपीएल’साठी भारतीय खेळाडूंचा कसोटी क्रिकेटकडे दुर्लक्ष करण्याचा कल पाहता हे पाऊल उचलले असल्याचे बोलले जात आहे. सध्या खेळाडूंना कसोटी खेळण्यासाठी 15 लाख रुपये मिळतात. (BCCI)

‘बीसीसीआय’च्या अधिकार्‍याने सांगितले की, ‘आयपीएलनंतर नवीन वेतन रचना लागू केली जाऊ शकते. यामध्ये खेळाडूने वर्षभरात संघासोबत सर्व कसोटी मालिका खेळल्यास त्याला बोनसही मिळेल. वार्षिक पगार आणि मॅच फी व्यतिरिक्त त्याला पैसेही दिले जातील. खेळाडूंनी रेड बॉल क्रिकेट खेळण्यात अधिक रस दाखवावा, यासाठी बोर्ड प्रयत्नशील आहे. त्यामुळे खेळाडूंना कसोटी खेळताना अधिक फायदा होणार आहे.’ (BCCI)

कसोटी क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी ‘बीसीसीआय’ने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. याचाच एक भाग म्हणजे खेळाडूंच्या वेतन वाढीची योजना आहे.

संबंधित बातम्या

एका मोसमातील सर्व कसोटी मालिका खेळल्यास खेळाडूला मिळणार्‍या अतिरिक्त बोनस देण्यावर ‘बीसीसीआय’ विचार करत आहे. सध्या ‘बीसीसीआय’ प्रत्येक कसोटी सामन्यासाठी 15 लाख रुपये, एकदिवसीय सामन्यासाठी 6 लाख रुपये आणि टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी 3 लाख रुपये वेतन देते. टीम इंडियाच्या खेळाडूंना सेंट्रल कॉन्ट्रॅक्टच्या माध्यमातून त्यांच्या ग्रेडनुसार वार्षिक पगारही दिला जातो.

अलीकडेच ‘बीसीसीआय’ने केंद्रीय करारामध्ये समाविष्ट असलेल्या खेळाडूंबाबत इशारा दिला होता. जे खेळाडू तंदुरुस्त आहेत आणि राष्ट्रीय संघाचा भाग नाहीत त्यांना देशांतर्गत क्रिकेट खेळावे लागेल, असे बोर्डाने म्हटले होते. असे असूनही, इशान किशन, श्रेयस अय्यर, कृणाल पंड्या आणि दीपक चहर या खेळाडूंनी त्यांच्या राज्यांसाठी रणजी सामने खेळले नाहीत. इशान, कृणाल आणि चहर यांनी फेब्रुवारीमध्येच ‘आयपीएल’ची तयारी सुरू केली. इशान मुंबई इंडियन्सकडून खेळतो, पंड्या लखनऊ सुपरजायंटस्कडून आणि चहर चेन्नई सुपरकिंग्जकडून खेळतो.

हेही वाचा :

Back to top button