Shivaji University : शिवाजी विद्यापीठात टेस्ट ट्यूबमध्ये दुर्मीळ वनस्पतींचे संवर्धन

Shivaji University : शिवाजी विद्यापीठात टेस्ट ट्यूबमध्ये दुर्मीळ वनस्पतींचे संवर्धन
Published on
Updated on

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील वनस्पतीशास्त्र विभागात पॉलीगाला, पिंडा कोकेनेन्सिसला यासह 100 उपयोगी दुर्मीळ वनस्पतींचे टेस्ट ट्यूबमध्ये ऊती संवर्धन केले जात आहे. विविध प्रकारच्या दुर्मीळ वनस्पतींची लागवड करता येईल, असे संशोधन प्रयोगशाळेत होत आहे. विविध आजारांवर उपायोगी अशी औषधी शोधण्याचे प्रयत्न सुरू आहे. (Shivaji University)

भारताला आयुर्वेदाची प्राचीन परंपरा आहे. देशभरात आयुर्वेदिक वनस्पतींचा खजिना आहे, परंतु त्यावर सखोल संशोधन न झाल्याने अनेक वनस्पती नामशेष होत असल्याचे चित्र आहे. बर्‍याचशा औषधी वनस्पती या दुर्मीळ आहेत व त्या वर्षभर उपलब्ध नसतात. तथापि, प्रयोगशाळेतील संशोधनातून या वनस्पतीतून वर्षभरात औषध निर्मिती शक्य होते. काही उपयोगी वनस्पतींचे पुनरुज्जीवन विद्यापीठाच्या प्रयोगशाळेतील टेस्ट ट्यूबमध्ये केले जात आहे. मराठीत यास ऊती संवर्धन तर इंग्रजीत टिश्यू कल्चर असे म्हणतात. नामशेष झालेल्या झाडांचे बियाणेच सापडले पाहिजे असे नाही तर त्या झाडाचे खोड, पान, फांदी अथवा परागकण जरी सापडले तरी त्या दुर्मीळ झाडाचा पुनर्जन्म प्रयोगशाळेत केला जाऊ शकतो. (Shivaji University)

'पॉलीगाला' ही औषधीद़ृष्ट्या महत्त्वाची व पॉलीगॅलेसी कुटुंबातील एक प्रमुख वनस्पती आहे. 'पॉलीगाला'ला मराठीमध्ये गुलपंखी असे म्हणतात. पॉलीगाला प्रजातीचा उपयोग साप चावण्यावर उपचारासाठी व खोकला, ब—ाँकायटिससाठी कफ पाडणारे औषध म्हणून करतात. याशिवाय पॉलीगाला प्रजातींचा वापर न्यूरोप्रोटेक्टिव्ह, अँटिडिप्रेसेंट, वेदनशामक, अँटी-एथेरोस्क्लेरोसिस, सायटोटॉक्सिक, अँटिट्यूमर, झेंथिन-ऑक्सिडेस इनहिबिटरी इफेक्ट, अँटीओबेसिटी इफेक्ट, ऑस्टियोपोरोसिसचा पॉलीसेकेराइड प्रतिबंध करणारी आहे.

पिंडा कोकेनेन्सिसला मराठीत 'कोकण पंद' असे म्हणतात. पिंडा ही कंदयुक्त मुळे असलेली औषधी वनस्पती आहे. त्यात लहान फांद्या असलेल्या देठ व पिनेट पाने पांढरी असतात. फुले आकर्षक कंपाऊंड छत्रांमध्ये गुंफलेली, अधूनमधून पश्चिम घाटाच्या जंगलात उंच कडांवर दिसतात. लोक न शिजवतादेखील खातात. वनस्पतीचा दाहक-विरोधी, सौंदर्य प्रसाधने व कॅन्सरवरील उपचारासाठी उपयोग होतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news