‘इस्लाम’च्या मूळ भूमीतील पहिल्या हिंदू मंदिराची गोष्ट | पुढारी

‘इस्लाम’च्या मूळ भूमीतील पहिल्या हिंदू मंदिराची गोष्ट

अबुधाबी; वृत्तसंस्था : संयुक्त अरब अमिरात (यूएई) ही देखील सौदी अरेबियाप्रमाणेच इस्लामची मूळ भूमी. या भूमीत अगदी परवापरवापर्यंत अन्य धर्मियांना त्यांच्या परंपरा पाळणेही दुरापास्त होते. त्यामुळेच यूएईच्या अबुधाबीतील पहिल्या हिंदू मंदिराला एक वेगळे महत्त्व आहे.

जगभरातील आधुनिक, उदारवादी मुस्लिम या मंदिराचे म्हणूनच स्वागतही करीत आहेत. या मंदिराची कथाही मोठी रंजक आहे. मंदिराचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे सनातन धर्मियांसह मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, जैन, पारशी पंथातूनही त्याच्या उभारणीत मोलाचे योगदान लाभलेले आहे. अगदी नास्तिकाचाही (निरीश्वरवादी) वाटा या मंदिराच्या उभारणीत आहे. अशा स्वरूपाचे कदाचित हे जगातील पहिलेच मंदिर असावे.

उंची : 108 फूट
लांबी : 262 फूट
रुंदी : 180 फूट
खर्च : 700 कोटी रु.

  • 50,000 घनफूट इटालियन मार्बल
  • 1800000 घनफूट इंडियन सँड स्टोन
  • 1800000 दगडी विटा
  • 30,000 मूर्ती

Back to top button