Delhi : दिल्लीत गोकुळपुरी मेट्रो स्टेशनवर स्लॅब कोसळून एकाचा मृत्यू | पुढारी

Delhi : दिल्लीत गोकुळपुरी मेट्रो स्टेशनवर स्लॅब कोसळून एकाचा मृत्यू

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिल्लीतील  गोकुळपुरी मेट्रो स्थानकावरील भिंतीच्या बाजूचा स्लॅब आज (दि.८) कोसळला. ही घटना सकाळी ११ च्या सुमारास घडली.  या अपघातात ३ ते ४ जण जखमी झाले होते. जखमीपैकी एकजण गंभीर जखमी होता.  जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान जखमी व्यक्तीचा मृत्यू झाला. अद्याप जखमी व्यक्तीबद्दल माहिती समजलेली नाही. (Delhi)

Delhi : एकाचा मृत्यू

माहितीनुसार, दिल्लीतील  गोकुळपुरी मेट्रो स्टेशनवर आज सकाळी (दि.८) बाजूचा स्लॅब कोसळला. यात किमान ३ ते ४ जण जखमी झाले. ढिगाऱ्याखाली एकजण अडकून गंभीर जखमी झाला होता. जखमींना नजीकच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. स्थानिक पोलीस आणि मेट्रोचे कर्मचारी घटनास्थळी हजर आहेत. डीसीपी (ईशान्य), जॉय टिर्की यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही लोकांच्या मदतीने पोलीस कर्मचाऱ्यांनी ढिगाऱ्याखाली अडकलेल्या व्यक्तींना बाहेर काढण्यात यश मिळवले. “घटना घडली तेव्हा मृत्यू झालेला व्यक्ती  त्याच्या स्कूटीवर चालला होता. त्याच दरम्यान स्लॅप ढासळला.

Back to top button