Chavali : चवळीत पनीर-बदामपेक्षा अधिक प्रोटिन; शाकाहारी लोकांसाठी लाभदायक | पुढारी

Chavali : चवळीत पनीर-बदामपेक्षा अधिक प्रोटिन; शाकाहारी लोकांसाठी लाभदायक

नवी दिल्ली : अंडी, दूध यासारख्या काही पदार्थांमध्ये प्रोटिन्स म्हणजेच प्रथिनांचे प्रमाण चांगले असते. मात्र, डाळी हा त्याचा एक उत्तम स्रोत असतो हे सुद्धा लक्षात घेतले पाहिजे. चवळीमध्येही Chavali पनीर-बदामपेक्षा अधिक प्रोटिन असते असे आहारतज्ज्ञांनी म्हटले आहे. एक वाटीभर चवळीत दोन अंड्यांइतके प्रोटिन असते!

नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या रिपोर्टनुसार चवळीत Chavali पॉलिफेनॉल्सचे प्रमाण अधिक असते. ते शरीरात अँटिऑक्सिडंटस् म्हणून कार्य करते. त्यामुळे पेशींचे नुकसान टाळण्यास मदत होते व आजारांपासूनही रक्षण होते. चवळीमध्ये अनेक पोषक घटक असतात. विशेषतः प्रोटिन व कॅल्शियमचा हा चांगला स्रोत आहे. शाकाहारी लोकांना प्रोटिन्स मिळवण्यासाठी चवळी लाभदायक ठरू शकते.

चवळीमध्ये Chavali फायबर्स व खनिजेही असतात. एक कप म्हणजेच 170 ग्रॅम चवळीत 13 ग्रॅम प्रोटिन असते, जे अंड्यांच्या तुलनेत दुप्पट आहे. या डाळीत दुधाच्या तुलनेत चौपट जास्त प्रोटिन असते. चवळीच्या सेवनाने दिवसभर शरीरात ऊर्जा राहते. स्नायू मजबूत बनवण्यासाठी तसेच पोटाशी संबंधित समस्या दूर ठेवण्यासाठीही चवळी उपयुक्त आहे. अनेक संशोधनांमधून दिसून आले आहे की रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठीही चवळी उपयुक्त ठरते.

Back to top button