यापुढे गडचिरोली जिल्हा विकासाच्या वाटेवर धावेल: देवेंद्र फडणवीस | पुढारी

यापुढे गडचिरोली जिल्हा विकासाच्या वाटेवर धावेल: देवेंद्र फडणवीस

गडचिरोली, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील युवक, युवतींमध्ये जो उत्साह आहे; त्याच उत्साहाने गडचिरोली जिल्हादेखील विकासाच्या वाटेवरुन धावेल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

गडचिरोली पोलिस दलाच्या वतीने आज (दि.४) सकाळी महा मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले. यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम, खासदार अशोक नेते, आ.डॉ. देवराव होळी, आ.कृष्णा गजबे, जिल्हाधिकारी संजय मीणा, मुख्य कार्यपालन अधिकारी आयुषी सिंह, पोलिस अधीक्षक नीलोत्पल सहभागी झाले होते. या मॅरेथॉनमध्ये १३ हजारांहून अधिक युवक, युवती आणि नागरिक धावले.

याप्रसंगी फडणवीस यांनी मॅरेथॉनमध्ये धावणाऱ्या युवक, युवतींचे कौतूक केले. तुमच्यामध्ये असणारा जो उत्साह आहे; त्याच उत्साहाने यापुढे गडचिरोली जिल्हादेखील विकासाच्या वाटेवरुन धावेल. या जिल्ह्याला आता धावण्यापासून कुणीही रोखू शकणार नाही.

हेही वाचा 

Back to top button