सर्व्हन्ट्स ऑफ इंडिया प्रकरण : प्राप्तिकर विभागाकडून कारवाई केव्हा होणार? | पुढारी

सर्व्हन्ट्स ऑफ इंडिया प्रकरण : प्राप्तिकर विभागाकडून कारवाई केव्हा होणार?

पुणे : पुढारी वृत्तसेवा : सर्व्हन्ट्स ऑफ इंडिया सोसायटीमध्ये सचिव असलेले मिलिंद देशमुख यांनी केलेल्या आर्थिक घोटाळ्यांबाबत प्राप्तिकर विभागाकडे तक्रार दाखल आहे, मात्र त्यावर अजूनही कारवाई नाही. यापूर्वी नामदार गोखले यांचे पणतू अ‍ॅड. सुनील गोखले यांनी अशीच तक्रार केली होती, मात्र त्यांचे अचानक निधन झाल्याने हे प्रकरण मागे पडले. तसेच वरिष्ठ विश्वस्त पी. के. द्विवेदी यांनी धर्मादाय आयुक्त यांची अनुमती न घेता जमीन विकून लाखाचा सरकारी कर बुडवून धर्मादाय आयुक्तांचा नियम भंग केला. त्याची चौकशी आणि कारवाई केव्हा होणार असा सवाल तक्रारदारांनी केला आहे.

गोपाळकृष्ण गोखले यांचे पणतू दिवंगत अ‍ॅड. सुनील गोखले यांनी सर्व्हन्ट्स ऑफ इंडिया सोसायटीमध्ये सुरू असणारे अनेक गैरव्यवहार पाहताच नैतिक जबाबदारी स्वीकारून त्याविरुध्द लढा उभा केला. मिलिंद देशमुख हे सर्व्हन्ट्स ऑफ इंडिया सोसायटीच्या अधोगतीला कारण असल्याचे आढळताच त्यांचे विरुद्ध कारवाई व्हावी म्हणून पत्रव्यवहार व जनजागृतीही केली, तेव्हा प्राप्तिकर विभागाने तत्कालीन अध्यक्षांना चौकशीसाठी विचरणा करणारे पत्र दि. 17 जुलै 2016 रोजी दिल होतेे. मात्र अ‍ॅड. सुनील गोखले यांचे दुर्दैवाने निधन झाले, त्याचे कारण मात्र अजून समजलेले नाही.

पेचपेडवा येथील व्यवहारात कर बुडवला..

अ‍ॅड. सुनील गोखले यांचे निधन होताच, गैरफायदा घेत अध्यक्ष दामोदर साहू यांनी प्रकरण दाबले आणि देशमुख यांच्यावरील कारवाई बंद झाली. त्यामुळे देशमुख आणि साहू यांची सत्ता संस्थेत कायम रहावी म्हणून दोघांनी आर्थिक हितसंबंध सुरक्षित ठेवले. त्यामुळेच पेचपेडवा उत्तर प्रदेश येथील विकलेल्या जमिनीचे प्रकरण धर्मादाय आयुक्त यांच्या नजरेत न येऊ देता परस्पर व्यवहार करण्यासाठी पी. के. द्विवेदी यांना देशमुख आणि दामोदर साहू यांनी सम्मती दिली. ज्यामध्ये शासकीय प्राप्तिकर तर बुडविला तसेच धर्मादाय आयुक्त यांची सम्मती न घेता जमीन विकून धर्मदाय आयुक्त यांच्या नियमांची पायमल्ली केली.

नागपूरच्या इमारतीवरही देशमुखांचा डोळा…

मात्र नेवे यांचे निधन होताच देशमुख यांनी कुलगुरू डॉ. अजित रानडे यांचेमार्फत नागपूर शाखा ताब्यात घेऊन तिथे व्यावसायिक धोरण आखले. नागपूर येथील इमारती पुरातत्त्व विभागातर्फे संरक्षित आहेत. मात्र देशमुख व रानडे यांची नजर त्यावर ओळखून सार्वजनिक संस्थेचे कार्य आणि उद्देश आबाधित राहतील यासाठी प्रवीण कुमार राऊत यांनी ही जबाबदारी धर्मादाय आयुक्तांकडे घेतली. तसेच प्राप्तिकर विभागालासुध्दा तक्रार दिली आहे. त्यावर त्वरित कारर्वाइ व्हायला पाहिजे, म्हणून ते त्याचा मागोवा घेत आहेत. याबाबत प्रवीणकुमार राऊत यांनी या प्रकरणाच्या चौकशीचा पाठपुरावा पुणे प्राप्तिकर विभागाकडे केला तेव्हा जानेवारीअखेरीस कारवाई होण्याची शक्यता प्राप्तिकरच्या अधिकार्यांनी सांगितले होते.

महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्थ व्यवस्था अधिनियम कायद्यामध्ये सन 2017 मधे मोठ्या प्रमाणात दुरुस्ती करण्यात आलेली आहे. त्यामधे विश्वस्थ बरखास्तीच्या तरतुदी मध्येसुद्धा दुरुस्ती करण्यात आलेली आहे. सर्व्हंन्टस ऑफ इंडिया या प्रकरणात विश्वस्तांच्या बरखास्तीची प्रक्रिया दुरुस्त तरतुदी प्रमाणेच सुरु आहे. त्यामुळे पुढील येणार्या काळात या प्रकरणाचा निर्णय लवकर होईल अशी आशा आहे.

– अ‍ॅड. रमाकांत वैदकर

नेवे यांनी दिला होता धोक्याचा इशारा

नागपूर शाखेचे दिवंगत सदस्य रमेशचंद्र नेवे यांच्या शिफारशीवरून प्रवीण कुमार राऊत हे सर्व्हन्ट्स ऑफ इंडिया सोसायटीचे आजीवन सदस्य असल्याने त्यांनी सुनील गोखले यांची मुलाखत घेतली होती, तेव्हापासून नेवे यांनी देशमुख आणि दामोदर साहू यांच्याकडून संस्थेला धोका आहे. देशमुख यांना कुठल्याही प्रकारचे सहकार्य करणार नाही असे डिसेंबर 2018 च्या पत्रात नमूद केले होते, मात्र ते पत्र देशमुख यांनी गायब केले.

हेही वाचा

Back to top button