किल्ले रायगड गडारोहण स्पर्धेत पूजा सावंत, आदित्य अवकीरकर विजेते | पुढारी

किल्ले रायगड गडारोहण स्पर्धेत पूजा सावंत, आदित्य अवकीरकर विजेते

महाड: पुढारी वृत्तसेवा : स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केला जाणाऱ्या किल्ले रायगडावरील राज्यस्तरीय गडारोहण स्पर्धेला शिवभक्तांनी तसेच खेळाडूंनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सुमारे 185 पेक्षा जास्त मुला मुलींनी तसेच ज्येष्ठ नागरिकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. Raigad

श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ व स्थानिक उत्सव समितीच्या वतीने या स्पर्धा पुरुष व महिलांच्या प्रत्येकी तीन व खुल्या गटासह आयोजित करण्यात आल्या होत्या. Raigad

पुरुष प्रथम गटात आदित्य बाबू अवकीरकर याने 25 मिनिटे 25 सेकंदात गड सर केला. तर महिलांच्या प्रथम गटात पूजा तुकाराम सावंत हिने 28 मिनिटे 50 सेकंद, द्वितीय गटात कथा अतुल वाडकर हिने 31 मिनिटांमध्ये, तर तृतीय गटात शिल्पा शंकर केंबळे हिने 28 मिनिटे 43 सेकंदामध्ये गड चढून जाण्याचा पराक्रम केला.

चित्त दरवाजा येथील शिरकाई देवीच्या मंदिरापासून महादरवाजामार्गे होळीचा माळ येथील गडावरील शिरकाईदेवी पर्यंत हा स्पर्धेचा मार्ग निश्चित करण्यात आला होता. या स्पर्धेतील प्रथम क्रमांकच्या विजेत्यांना दि. 23 एप्रिलरोजी होणाऱ्या शिवपुण्यतिथी सोहळ्यात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस प्रदान करण्यात येणार आहे.

हेही वाचा 

Back to top button