रायगड: हिंदवी स्वराज्याच्या ३५० व्या वर्षांनिमित्त ३७३ किल्ल्यांवर फडकला तिरंगा, भगवा ध्वज; १७३ संस्थांचा सहभाग | पुढारी

रायगड: हिंदवी स्वराज्याच्या ३५० व्या वर्षांनिमित्त ३७३ किल्ल्यांवर फडकला तिरंगा, भगवा ध्वज; १७३ संस्थांचा सहभाग

महाड, पुढारी वृत्तसेवा : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या राज्याभिषेक सोहळ्याचे औचित्य साधून प्रजासत्ताक दिनी अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाच्या वतीने ३७३ किल्ल्यांवर राष्ट्रध्वजासह भगवा झेंडा फडकावला. यावेळी शिवप्रतिमा पूजन करण्यात आले. या मोहिमेत १० हजारांहून अधिक शिवप्रेमींनी सहभाग नोंदविला. यावेळी पुरातत्व खाते, राज्य सरकारचे पुरातत्व खाते, पोलीस, सरकारी कर्मचारी उपस्थित होते.

अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाचे अध्यक्ष उमेश झिरपे, कार्यकारी अध्यक्ष ऋषिकेश यादव, सचिव डॉ. राहुल वारंगे, सहसचिव राहुल मेश्राम, खजिनदार दीपाली भोसले यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ही मोहीम यशस्वी करण्यात मोलाचे योगदान दिले.

या मोहिमेत एकूण १७३ संस्थांनी सहभाग नोंदविला. यातील प्रत्येक संस्थेकडे किमान एका किल्ल्याची जबाबदारी देण्यात आली होती. महाड, पोलादपूर तालुक्यातील व परिसरातील एकूण १२ किल्ल्यांवर विविध संस्था आणि संघटनांच्या वतीने तिरंगा आणि भगवा ध्वज फडकविण्यात आला.

खालील किल्ल्यांवर संस्था, संघटनांनी ध्वजारोहण आले.

दौलत गड – दासगाव जागर,
सोनगड – श्री छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती,
दुर्गदुर्गेश्वर रायगड, चांभारगड – साद सह्याद्री प्रतिष्ठान बिरवाडी, सह्याद्री प्रतिष्ठान गांधार पाले,
किल्ले रायगड- कोकण कडा  महाड, सह्याद्री मित्र महाड,
पाचाडचा कोट  – मावळा संघटना कोंझरपाचाड
कोकण दिवा- साद सह्याद्री प्रतिष्ठान बिरवाडी,
लिंगाणा – अॅडव्हेंचर सोल्स,
कावळेसाद – शिव सेवा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पारमाची घाट,
कांगोरी – साद सह्याद्री प्रतिष्ठान बिरवाडी,
कोंढवी – यंग ब्लड अॅडव्हेंचर पोलादपूर,
चंद्रगड – शिवमुद्रा प्रतिष्ठान, पोलादपूर,
मोहनगड – सह्याद्री मित्र महाड

हेही वाचा 

Back to top button