महाड, पुढारी वृत्तसेवा : भारतीय प्रजासत्ताक दिन महाड शहरासह संपूर्ण तालुक्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करून उत्साहात आज (दि.२६) साजरा करण्यात आला. यंदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाच्या आवाहनानुसार महाड, पोलादपूर तालुक्यातील बारा किल्ल्यांवर राष्ट्रध्वजासह भगवा झेंडा फडकवून छत्रपती शिवरायांना आगळ्या पद्धतीने अभिवादन करण्यात आले. Raigad
महाडमधील चांदे क्रीडांगणावर महाडचे प्रांताधिकारी डॉ. ज्ञानोबा बाणापुरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर महाड पोलीस, विविध शाळांच्या स्काऊटची पथके, एनसीसी व एनएसएससी कॅडेट यांनी उपस्थित मान्यवरांना मानवंदना दिली. विद्यार्थ्यांनी कवायती व शारीरिक कसब कलाकृती सादर करून उपस्थितांची मने जिंकली. यावेळी तहसीलदार महेश शितोळे, डीवायएसपी शंकर काळे आदी उपस्थित होते. Raigad
महाडमधील विविध सामाजिक संस्थांच्या वतीने देखील प्रजासत्ताक दिनाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी सांदोशी येथील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये महाडचे माजी सभापती संतोष गायकवाड व त्यांच्या सहकाऱ्यांकडून तसेच संस्थाकडून परिसरातील पंधरा शाळांना संविधानाच्या प्रतींचे वाटप करण्यात आले. महाड परिसरातील आदिवासी पाड्यांवर जाऊन विविध सामाजिक संस्थांकडून तसेच युवकांकडून जिलेबीचे वाटप करण्यात आले.
हेही वाचा