Parbhani News : मनसेचे बालाजी मुंडे यांच्यावरील खोटे गुन्हे रद्द करा: सर्वपक्षीयांचे निवेदन | पुढारी

Parbhani News : मनसेचे बालाजी मुंडे यांच्यावरील खोटे गुन्हे रद्द करा: सर्वपक्षीयांचे निवेदन

गंगाखेड, पुढारी वृत्तसेवा : सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता बालाजी पवार यांनी मनसे नेते बालाजी मुंडे यांच्यावर दाखल केलेले खंडणीचे खोटे गुन्हे तात्काळ रद्द करा, अन्यथा ३० जानेवारी रोजी गंगाखेड शहर बंद व रास्ता रोको करण्याचा इशारा सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी दिली. याबाबतचे निवेदन आज (दि.२७) जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे व जिल्हा पोलीस अधीक्षक रागसुधा आर. यांना देण्यात आले. Parbhani News

भाजपचे जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे, बीआरएसचे नेते तथा माजी जिल्हा परिषद सदस्य भगवान सानप, माजी नगराध्यक्ष रामप्रभू मुंडे, भाजपचे राज्य कार्यकारणी सदस्य विठ्ठलराव रबदडे, युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रणित खजे, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीराम मुंडे, वेंकटराव तांदळे, नाभिक संघटनेचे नेते बाळासाहेब पारवे, माजी नगरसेवक मनोहर महाराज केंद्रे यांनी जिल्हाधिकारी व एसपी यांना निवेदन दिले. Parbhani News

या निवेदनात म्हटले आहे की, उपविभागीय अभियंता पवार यांनी मनसे नेते बालाजी मुंडे यांच्यावर पूर्वनियोजित कट करून खोटे गुन्हे दाखल केले आहेत. वास्तवात बालाजी मुंडे हे त्यादरम्यान माजी नगराध्यक्ष रामप्रभू मुंडे यांच्या कार्यालयासमोर सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आल्याचे पुरावे जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत. अभियंता पवार यांनी कुणाच्या इशाऱ्यावर खोटा गुन्हा दाखल केला, याची सखोल चौकशी करून पवार यांच्याविरोधातच कडक कारवाई व्हावी, अशी मागणी सर्वपक्षीय नेते, पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना केली आहे.

हेही वाचा 

Back to top button